ठेकेदाराची गुंडगिरी; पैशांवरून हवेत गोळीबार करून मजुराला बेदम मारहाण

पैशांच्या उचलीवरून मजूर आणि ठेकेदारामध्ये वाद, या प्रकरणात दोन मजूर जखमी.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 10:40 AM IST

ठेकेदाराची गुंडगिरी; पैशांवरून हवेत गोळीबार करून मजुराला बेदम मारहाण

हिंगोली, 11 ऑक्टोबर: ठेकेदार आणि मजुरांमध्ये पैशाच्या उचलीवरून वाद झाला. वादाचं रुपांतर हाणामारी आणि गोळीबारात झाल्यानं परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका इथे राष्ट्रीय महामार्गाचे सुरू होते. त्यादरम्या हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. मजुरांना पांगविण्यासाठी ठेकेदाराने गोळीबार करून पिस्तुलने मजुरांना मारहाण केली. यामध्ये एका मजुराला गोळी लागली असून ठेकेदारानं केलेल्या मारहाणीत संजयकुमर निषाद आणि हरिप्रसाद निषाद हे दोन मजूर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. गोळीबार झाल्यानंतर आलेल्या आवाजामुळे परिसरातील ग्रामस्थ जमा झाले. दरम्यान पकडले जावू नये म्हणून मजूरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी पोलिसांनी संतोष सिंग आसाराम सिंग  आणि रवीकुमार किसनप्रसाद यांच्यासह एक पिस्तूल ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आचारसंहितेमुळे पोलिसांनी शस्त्र जमा करून घेतली असतानाही हा प्रकार कसा घडला हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात झाली आहे.

ड्रग्ज माफियांचा पोलिसांवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी केली मारहाण

ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या बठिंडा जिल्ह्याच्या पोलिस पथकावर हल्ला करण्यात आला. हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील देसुजोधा गावात पोलीस ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी गेले असता ग्रामस्थांनी पोलिसांवरच हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसंच पोलिसांवर गोळीही चालवली. या घटनेत 6 पोलीस गंभीर जखमी झाले असून एका पोलिसाला गोळीही लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hingoli
First Published: Oct 11, 2019 09:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...