हिंदू महासभेच्या नेत्याची भरदिवसा धारदार शस्त्रानं गळा चिरून निर्घृण हत्या

हिंदू महासभेचे माजी अध्यक्षाची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 03:06 PM IST

हिंदू महासभेच्या नेत्याची भरदिवसा धारदार शस्त्रानं गळा चिरून निर्घृण हत्या

लखनौ,18 ऑक्टोबर : हिंदू महासभेचे माजी अध्यक्षाची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कमलेश तिवारी असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तिवारी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. पण डॉक्टरांनुसार कमलेश तिवारी यांची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या केली गेली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील नाका परिसरातील ही धक्कादायक घटना आहे.

पिस्तुल पोलिसांच्या ताब्यात

या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं. घटनास्थळावरून पोलिसांनी पिस्तुल ताब्यात घेतलं. ओळखीच्याच व्यक्तिनं कमलेश तिवारी यांची हत्या घडवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. दरम्यान, हल्ल्यात गंभीर झालेल्या कमलेश तिवारी यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

(वाचा : ड्रग्स घेऊन खेळाडूची मुलींसोबत SEX पार्टी, VIDEO लीक झाल्याने खळबळ)

मिळालेल्या माहितीनुसार, गोळ्या झाडून नाही तर धारदार शस्त्रानं कमलेश तिवारी यांची गळा चिरून हत्या केल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला तिवारी यांच्या खुर्शीद बाग येथील निवासस्थानी करण्यात आला.

(वाचा : सेक्स व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, अर्ध्या तासात पाठवले 30 हजार ई-मेल)

ते दोन व्यक्ती कोण?

दोन व्यक्ती तिवारींच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी आले होते. एकानं भगव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. पण हे दोघं नेमके कोण होते, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

(वाचा :'ते माझ्यावर अश्लील कमेंट्स करतात, पत्र लिहून BHEL कंपनीच्या अकाऊंटंटची आत्महत्या)

हिंदू समाज पार्टीची केली होती स्थापना

कमलेश तिवारी यांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषवले आहे. तिवारी यांनी पैगंबर मोहम्मद साहब यांच्याविरोधात टिप्पणी केल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी त्यांना अटक करून तुरूंगातही रवानगी करण्यात आली होती. यानंतर 2017मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंदू समाज पार्टीची स्थापना केली होती.

2 तासांपासून प्रफुल पटेल यांची चौकशी, पाहा ईडी कार्यालयातून GROUND REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 02:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...