ऊना, 12 ऑगस्ट : आजकाल व्हॉट्सअॅप (Whats App) हे माधम्य प्रत्येकासाठी सोयीचं साधन बनलं आहे. पण यातून अनेक गुन्ह्यांच्या(Crime) घटनाही समोर आल्या आहेत. गुन्ह्याचा असाच एक भयानक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअॅपवरुन झालेल्या मैत्रीची तरुणीला मोठी किंमत मोजावी लागली. पीडित तरुणीने युवकाविरूद्ध महिला पोलीस ठाणे उना (Women Police Station Una) इथे तक्रार दिली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
हॉटेलमध्ये घेऊन गेल्याचा आरोप
हिमाचल प्रदेशच्या उनामध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 26 वर्षीय पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये जिल्हा चंबा इथल्या एका युवकाने व्हॉट्सअॅपवरुन मैत्री केली. त्या युवकाशी रोज बोलणं होत होतं. दरम्यान, तो तरुण मला भेटायला उना इथे आला आणि मला हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्या युवकाने हॉटेलमध्ये माझा अश्लील फोटो काढला. एवढेच नाही तर माझ्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवले.
वडील झोपेत घोरत होते म्हणून आला राग, मुलाने बापालाच पाठवलं मृत्यूच्या दारात
अश्लील फोटोवरून सुरू केली ब्लॅकमेलिंग
फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने या तरुणाने पीडितेला वारंवार भेटायला बोलावलं. भीतीने घाबरुन ती त्याला धर्मशाला, चंदीगड आणि अमृतसर इथे भेटायला गेली. पीडित तरुणीचं म्हणणे आहे की, आरोपी तरुणाने तिच्या चारित्र्यावर बोट ठेवत तिचा विवाहदेखील मोडला. 7 ऑगस्ट रोजी दोन वेगवेगळ्या फेसबुक आयडीववरून अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
पोलीस उपनिरीक्षकाचं गाडीवरून सुटलं नियंत्रण, पुढे घडला धक्कादायक प्रकार
आरोपी तरुणाने पीडितेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यासंबंधी पीडितेने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संपूर्ण घटना लक्षात गेता पीडितेच्या सांगण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.