मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

देवाकडून प्रेरणा घेतल्याचं सांगत घरातच गांजाची शेती; उच्चशिक्षित तरुणाचा कांड पाहून पोलिसही चक्रावले

देवाकडून प्रेरणा घेतल्याचं सांगत घरातच गांजाची शेती; उच्चशिक्षित तरुणाचा कांड पाहून पोलिसही चक्रावले

बिदादी (Bidadi) भागातल्या एका बंगल्यावर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं धाड टाकली, तेव्हा जवादनं तिथं हायड्रोपोनिक (Hydroponic) तंत्राचा वापर करून गांजाची शेती केल्याचं उघड झालं

बिदादी (Bidadi) भागातल्या एका बंगल्यावर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं धाड टाकली, तेव्हा जवादनं तिथं हायड्रोपोनिक (Hydroponic) तंत्राचा वापर करून गांजाची शेती केल्याचं उघड झालं

बिदादी (Bidadi) भागातल्या एका बंगल्यावर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं धाड टाकली, तेव्हा जवादनं तिथं हायड्रोपोनिक (Hydroponic) तंत्राचा वापर करून गांजाची शेती केल्याचं उघड झालं

बंगळुरू 29 सप्टेंबर : हिंदू संस्कृतीत भगवान शंकरांना (Lord Shankar) भांग (Cannabis) आवडते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला (Mahashivratri) काही भागामध्ये भगवान शंकराचा प्रसाद म्हणून आवर्जून भांग प्राशन करतात. होळीलादेखील भांगमिश्रित थंडाई प्राशन करण्याची प्रथा आहे. खरं तर भांग किंवा गांजा हे अमली पदार्थ असल्यानं त्याच्या वापरावर आपल्या देशात कायदेशीर बंदी आहे. मात्र अनेक ठिकाणी त्याची गुप्तपणे शेती केली जाते आणि त्याची तस्करी केली जाते. या मादक पदार्थांना चांगली किंमत मिळत असल्यानं लोक याची चोरून शेती करण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या लढवत असतात. बंगळुरूमध्ये (Bengaluru) एका उच्चशिक्षित तरुणानं गांजाची शेती करण्यासाठी वापरलेली शक्कल पाहून पोलिसही अवाक झाले.

बंगळुरूतल्या डीजे हळ्ळी (DJ halli) भागात पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या दोन तरुणांना नुकतंच पकडलं. तेव्हा त्यांच्या चौकशीतून या गांजाचा उगम असलेल्या ठिकाणी पोलीस पोहोचले, तेव्हा त्यांनाही घरातली ही शेती बघून धक्का बसला. या शेतीचा कर्ता-करविता होता 35 वर्षांचा जवाद रोस्तामपोर (Javad Rostampour) हा इराणी नागरिक (Irani Citizen). बिदादी (Bidadi) भागातल्या एका बंगल्यावर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं धाड टाकली, तेव्हा जवादनं तिथं हायड्रोपोनिक (Hydroponic) तंत्राचा वापर करून गांजाची शेती केल्याचं उघड झालं. इथूनच तो गांजा आपल्या मित्रांकरवी ग्राहकांना पुरवत असे. एका ग्रॅमसाठी तब्बल तीन ते चार हजार रुपये किंमत मोजून व्यसनी व्यक्ती हा गांजा विकत घेत असत. या प्रकरणी पोलिसांनी जवादसह चार जणांना अटक (Arrest) केली असून, त्यात व्हिसावर आलेल्या दोन इराणी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. व्हिसाची मुदत उलटूनही ते इथेच राहिले होते.

चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांना बेदम मारहाण; एकाचा तडफडून मृत्यू

या प्रकरणी अधिक माहिती देताना बंगळुरू शहर गुन्हे शाखेचे (Bengaluru City Crime Branch) पोलीस सहआयुक्त संदीप पाटील (Assistant Police Commissioner Sandip Patil) यांनी सांगितलं, की जवाद रोस्तामपोर 2010 मध्ये बंगळुरूमध्ये शिकण्यासाठी आला होता. कल्याणनगरमधल्या एका खासगी महाविद्यालयातून त्यानं एमबीए पूर्ण केलं. त्यानंतर तो कम्मन हळ्ळी (Kammanhalli) इथं एका घरात राहत होता. दरम्यानच्या काळात भगवान शिवशंकर आणि गांजाचं सेवन या नात्यानं त्याला भुरळ घातली. त्यातूनच साधारण तीन वर्षांपूर्वी त्यानं स्वतःच गांजा सेवन करण्यास सुरुवात केली; मात्र कोरोना साथीमुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात गांजा मिळणंही कठीण झालं आणि आर्थिक उत्पन्नही कमी झाल्यानं जवादनं स्वतःच गांजा पिकवायचा निर्णय घेतला. पुढील शिक्षण घेण्यासाठीही त्याला पैशांची गरज होती. त्यामुळं त्यानं गांजा पिकवणं, त्यावर प्रक्रिया करणं आणि इतर अन्य बाबींवर सहा महिने पुस्तकं, तसंच ऑनलाइन माध्यमातून सखोल अभ्यास केला.

28वर्षीय तरुणीवर 4जिल्ह्यात विविध ठिकाणी बलात्कार; हातपाय बांधून दिल्या नरकयातना

अखेर घरातच गांजा पिकवण्यासाठी हायड्रोपोनिक मॉडेल तयार केलं. प्रक्रिया करण्यासाठी एलईडी दिवे, आवश्यक रसायनं इत्यादी साहित्यसामग्री मागवली. युरोपमधून डार्क वेबद्वारे गांजाच्या 60 बिया मागवल्या आणि फिश टँकमध्ये पहिलं बी लावलं. यातून पिकणाऱ्या गांजाचा तो स्वतःसाठी वापर करत असे. तसंच मित्रांच्या मदतीने त्याची विक्री करत असे. त्यांचा हा धंदा चाललेला असतानाच साधारण एका वर्षापूर्वी शहर पोलिसांनी बंगळुरूमध्ये ड्रग्जचं एक मोठं रॅकेट पकडलं, त्यामुळं जवाद घाबरला आणि त्यानं आपला तळ कम्मनहळ्ळीतून बिदादी इथं एका खासगी व्हिलात हलवला. इथं हायड्रोपोनिकद्वारे त्यानं गांजाची 130 झाडं वाढवली होती. त्यावर प्रक्रिया करून गांजाची पावडर तयार करण्याची यंत्रणाही उभारली होती. घरातच केली जाणारी गांजाची अशी आधुनिक शेती बघून पोलिसांनाही मोठा धक्का बसल्याचं पोलीस सहआयुक्त संदीप पाटील यांनी सांगितलं.

First published:

Tags: Bengaluru, Crime