मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पत्नीच्या पत्रिकेत 'मंगळ' नसल्याने पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव; नेमकं प्रकरण काय आहे?

पत्नीच्या पत्रिकेत 'मंगळ' नसल्याने पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव; नेमकं प्रकरण काय आहे?

No Mars in wife Horoscope:आपल्या पत्नीच्या कुंडलीत 'मंगळ' नाही. त्यामुळे आपल्याला पत्नीकडून घटस्फोट (Divorce) हवा आहे. अशी याचिका नागपूरच्या एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नागपूर, 04 मार्च: आधुनिकतेची कास धरलेल्या भारताने काही दिवसांपूर्वी मंगळावर भारतीय उपग्रह उतरवला आहे. असं असताना दुसरीकडे देशात अंधश्रद्धेची पाळंमुळं किती घट्ट आहेत, याची पावती देणारी एक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीच्या कुंडलीत 'मंगळ' नाही. त्यामुळे आपल्याला पत्नीकडून घटस्फोट हवा आहे. अशी याचिका नागपूरच्या एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने संबंधित व्यक्तीला खडसावलं आहे.

कुंडलीत 'मंगळ' नसणं, हे घटस्फोटाचं कारण असू शकत नाही. तसेच कुंडलीत मंगळ नसल्याची बाब लपवणं हा काही छळवणूकीचा प्रकार नाही. असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. नागपूर कौटुंबिक न्यायालयाचा निकाल योग्यच असल्याचं सांगत न्यायमुर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमुर्ती नितीन सुर्यवंशी यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तसेच पतीची याचिकाही फेटाळून लावली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

नागपूरच्या दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या एका 37 वर्षीय पती आपल्या पत्नीच्या कुंडलीत मंगळ नाही. ही बाब तिने आणि तिच्या घरच्यांनी आपल्यापासून लपवून ठेवली. त्यामुळे आपल्याला घटस्फोट हवा आहे, अशी याचिका संबंधित व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. या व्यक्तीचं लग्न 2007 साली झालं होतं. त्यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुंडलीत 'मंगळ' असल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोपी पतीने लावला होता.

हे ही वाचा -नागपुरात कडक निर्बंध; अंत्यविधीला फक्त 20 जण; हॉटेल्सही 50 टक्के क्षमतेने

मुलाच्या कुंडलीतही मंगळ आहे, त्यामुळे भविष्यात अमंगळ गोष्टी घडू नये, म्हणून पतीने संबंधित अट घातली होती. लग्नानंतरचे काही सोडले तर त्यानंतरचे दिवस आपली पत्नी शांत शांत का राहत आहे, हे जाणून घेण्यासाठी पतीने पत्नीकडे कुंडलीची मागणी केली. पण पत्नीने कागदपत्रे हरवल्याचा बहाणा बनवून हे प्रकरण बऱ्याच दिवस लपवलं. पण पुढे पती पत्नीच्या नात्यात खटके वाढत असल्याचं पाहून मुलीच्या वडिलांनी 2009 मध्ये मुलीच्या शाळेचा दाखला आणून दिला.

हे ही वाचा -नागपूरमध्ये भाजपच्या गोटात खळबळ, नेत्यावर विनयभंग आणि अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

हा दाखला पाहिल्यानंतर पतीने आणि सासरच्या मंडळीने पत्नीवर आणि तिच्या घरच्यावर फसवणुकीचे आरोप लावायला सुरुवात केली. मुलीच्या कुंडलीत मंगळ असल्याची खोटी माहिती देवून आपली फसवणूक केल्याचा आरोप संबंधित पतीकडून सातत्याने लावला गेला. यानंतर पतीने हुंड्यासाठी पत्नीचा छळ करायला सुरुवात केली. दरम्यान पत्नीने मुलीला जन्म दिल्याने सासरच्या मंडळीचा छळ आणखी वाढतचं गेला, त्यामुळे पत्नीने सासरी नांदायला जाण्यास नकार दिला. त्यानंतर संबंधित याचिका दाखल करण्यात आली होती.

First published:

Tags: Crime news, Divorce, Nagpur