Home /News /crime /

‘Hello, तुमची पत्नी आणि मुलीचा अश्लील Video माझ्याजवळ आहे’; वाचा काय आहे प्रकार

‘Hello, तुमची पत्नी आणि मुलीचा अश्लील Video माझ्याजवळ आहे’; वाचा काय आहे प्रकार

यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    जीरकपूर, 4 जानेवारी : वी.आय.पी रोडवरील एका सोसायटीतील निवासी व्यावसायिकाला त्याची मुलगी आणि पत्नीचा अश्लील व्हिडीओ (Hello I have a porn video of your wife and daughter) असल्याचा दावा करीत तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडीओसाठी आरोपीने 1 लाख रुपयांची मागणी केली होती. व्यावसायिकाने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली. ज्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने केलेल्या तक्रारीत दिल्यानुसार, एका अज्ञात व्यक्तीने त्याला फोन केला आणि त्याची पत्नी आणि मुलीचा अश्लील व्हिडीओ, फोटो त्याच्याजवळ असल्याचं सांगितलं. जर त्याने 1 लाख रुपये दिले नाही तर ते अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल. यानंतर जीरकपूर पोलिसांनी तपासानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे ही वाचा-सोन्याची तस्करी चक्क अंडरवेअरमधून; तपासानंतर कस्टम विभागाचे अधिकारीही चक्रावले दरम्यान झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजधानी रांचीच्या ओरामांझी भागात तरुणीचा शिर कापलेल्या केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलीस मुलीबाबत माहिती शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ओरामांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुच्चू पंचायतीच्या जिराबारमधील साई नाथ विद्यापीठामागील पारस पात्रा जंगलात हा मृतदेह सापडला. मृतदेह नग्न अवस्थेत होता आणि शिर कापलेलं होतं. तरुणीचं वय 20 ते 22 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. जंगलात मुलीचा मृतदेह पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस डॉग स्क्वॉड आणि एफएसएल पथकांसह घटनास्थळी पोहोचले व तपास केला. परंतू पोलिसांना याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. हरवलेले डोकं अद्याप सापडलेले नाही. यामुळे मुलीची ओळख पटविण्यात अडचण निर्माण झाली आहे. रामिन एसपी नौशाद आलम यांनीही घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास केला. ते म्हणाले की, लवकरच आरोपींना अटक केली जाईल. घटनेच्या चौकशीसाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. ही घटना दुर्दैवी आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या