Home /News /crime /

हुंड्यासाठी माणुसकी विसरले; 9 महिन्यांच्या बाळासह आईला जिवंत जाळलं, थरकाप उडवणारा प्रकार

हुंड्यासाठी माणुसकी विसरले; 9 महिन्यांच्या बाळासह आईला जिवंत जाळलं, थरकाप उडवणारा प्रकार

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

दोन वर्षांपूर्वी महिलेचं लग्न झालं होतं.

    जयपूर, 14 मे : राजस्थानातील (Rajasthan News) चिकसाना येथे हुंड्यासाठी कुटुंबाने 9 महिन्याच्या मुलीला तिच्या आईसह जाळून हत्या केली. जळालेली लहानगी आणि तिच्या आईची अवस्था पाहून अंगावर काटा उभा राहील. मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात 9 महिन्यांची मुलगी आणि तिच्या आईच्या हत्येविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हुंड्यासाठी देत होते त्रास... लखनपूर येथील निवासी भगवान सिंह पूत्र मेगारामने पोलीस ठाण्यात कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला. यात त्यांनी लिहिलं की, भगवान सिंह यांच्या मुलीचं लग्न 9 फेब्रुवारी 2020 रोजी ओमप्रकाशसोबत झालं होतं. भगवान सिंहने आपल्या मुलीच्या लग्नात खूप पैसे खर्च केले होते. मात्र तरीही सासरची मंडळी तिला हुंड्यासाठी त्रास देत होती. मुलीने अनेकदा याबाबत आपल्या वडिलांनाही सांगितलं होतं. वडिलांनी सांगितल्यानंतरही सासरची मंडळी ऐकत नव्हते. हे ही वाचा-विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, असं फुटलं पतीचं बिंग पोलिसांनी सांगितलं की, शुक्रवारी सायंकाळी गावात एक 9 महिन्याची मुलगी आणि तिच्या आईला जिवंत जाळण्यात आलं. यात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलीच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder

    पुढील बातम्या