रुग्णालयात कोरोना रुग्णाला काठीनं मारहाण; आरोग्य कर्मचाऱ्याच्या दादागिरीचा VIDEO VIRAL

रुग्णालयात कोरोना रुग्णाला काठीनं मारहाण; आरोग्य कर्मचाऱ्याच्या दादागिरीचा VIDEO VIRAL

तक्रार केली म्हणून कोरोना रुग्णाला (corona patient) आरोग्य कर्मचाऱ्याने (health worker) मारहाण केली आहे.

  • Share this:

लखनौ, 22 ऑक्टोबर : कोरोना रुग्णांवर (Corona patient) नीट उपचार व्हावेत म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केलं जातं आहे. सुरुवातीला अनेक रुग्णालयात सोयीसुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र आता तर चक्क कोरोना रुग्णांना मारहाणही केली जात असल्याचं समोर आलं आहे. कोरोना रुग्णाला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आजही काही रुग्णालयात कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. या रुग्णांना रुग्णालयात नीट वागणूक दिली जात नाही आहे. आरोग्य कर्मचारी या रुग्णांना आवश्यक त्या सुविधा पुरवत नाही आहेत आणि याची तक्रार केल्यानंतर उलट रुग्णांनाच मारहाण केली जाते आहे. असाच मारहाणीचा उत्तर प्रदेशमधील हा व्हिडीओ आहे.

जौनपोरामध्ये घडलेली ही घटना आहे. जिथं कोरोना रुग्णाला काठीनं मारहाण करण्यात आली आहे. जिल्हा महिला रुग्णालयातील ही घटना आहे. जिथं कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. स्पेशल एल 2 मध्ये दाखल असलेल्या रुग्णाला आरोग्य कर्मचाऱ्याने मारहाण केली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे वाचा - कोरोनाग्रस्त महिलेसाठी राडा; अ‍ॅम्ब्युलन्सची तोडफोड, मारहाण करत महिलेला पळवलं

मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णा आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात जिल्ह्यातील संबंधित जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली. एल 2 मध्ये दाखल असलेल्या रुग्णांसोबत आरोग्य कर्मचारी नीट वागत नाही, साफसफाई करत नाही आणि अन्नही नीट देत नाही, अशी तक्रार या रुग्णाने केली. आहार आणि स्वच्छतेबाबत तक्रार केल्यानंतर आरोग्य कर्मचारी संतप्त झाले आणि त्यांनी या रुग्णाला मारहाण केली. दरम्यान रुग्णाने तक्रार केल्यानंतरही आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात कोणती कारवाई झाली नाही, अशी माहिती मिळते आहे.

हे वाचा - मास्कबाबत तपासणी करत असतानाच झाला दुसऱ्याच गुन्ह्याचा भांडाफोड, ठाण्यातील घटना

याआधीदेखील अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रातही याआधी क्वारंटाइन सेंटरमध्ये एका अपंग मुलाला  अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. शिर्डीत ही घटना घडली होती. क्वांराटाइन सेंटरमध्ये असलेला मुलगा बाहेर आला. त्यानंतर त्याला इकडं का आला असं विचारत तलाठ्यानेच अमानुषपणे मारलं होतं.

Published by: Priya Lad
First published: October 22, 2020, 10:50 PM IST

ताज्या बातम्या