मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Video कॉल रिसीव्ह करताच स्क्रीनवर न्यूड तरुणी...अन् नरक झालं 76 वर्षांच्या वृद्धाचं आयुष्य

Video कॉल रिसीव्ह करताच स्क्रीनवर न्यूड तरुणी...अन् नरक झालं 76 वर्षांच्या वृद्धाचं आयुष्य

 एका व्हिडीओमुळे त्यांचं आयुष्य बदललं.

एका व्हिडीओमुळे त्यांचं आयुष्य बदललं.

एका व्हिडीओमुळे त्यांचं आयुष्य बदललं.

    नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : 76 वर्षांची एक ज्येष्ठ व्यक्ती दिल्लीत आनंदात आपलं आयुष्य घालवत होती. कधी एका मुलाकडे तर कधी गाजियाबाद येथील दुसऱ्या मुलाच्या घरी राहत होती. सामाजिक कार्यात असल्याकारणाने त्यांना परिसरात प्रतिष्ठा होती. 7 ऑगस्ट रोजी आलेल्या एका व्हिडीओमुळे त्यांचं आयुष्य बदललं. आपल्या नातेवाईकांसोबत असताना त्यांना सेक्सटॉर्शनचा कॉल आला होता. वारंवार कॉल येत असल्याने एकाने त्यांच्या हातातून फोन खेचून घेतला. तेव्हा लक्षात आलं की, यांना सेक्सटॉर्शनचे कॉल येत आहेत. त्यावेळी वृद्धाने सांगितलं की, 7 ऑगस्ट रोजी त्यांना एक व्हिडीओ कॉल आला होता. कॉल रिसीव्ह केला तेव्हा एक न्यूड मुलगी दिसली. ती अश्लील कृत्य करीत होती. साधारण दीड मिनिटं हा कॉल सुरू होता. यानंतर एका मुलीचा कॉल आला जी, धमकी देत होती. आणि तिने 50 हजार रुपयांचा मागणी केली. जर त्याने पैसे दिले नाही तर  त्याच्या फोन कॉल लिस्टमधील सर्वांना हा व्हि़डीओ पाठवला जाईल. मुलीला फूस लावून पळवून नेलं, कोर्टाकडून अद्दल घडवणारी शिक्षा, भंडारा जिल्हा कोर्टाचा मोठा निर्णय यानंतर वृद्ध व्यक्ती घाबरली. यानंतर ते जेवणाकडेही लक्ष देत नव्हते. त्यानंतर एकेदिवशी त्यांना सायबर क्राइमचे इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार नावाने त्यांना कॉल आला आणि यात त्यांच्याविरोधात एक महिलेने तक्रार केल्याचं सांगितलं. यानंतर वृद्ध व्यक्ती घाबरली. यानंतर त्यांना आणखी एक कॉल आला ज्यात तो व्हिडीओ युट्यूबवर टाकण्याची धमकी दिली. तो काढण्यासाठी 17,200 रुपयांचा दंड भरावा लागेल असंही सांगण्यात आलं. यानंतर वृद्धाने त्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर तत्सम व्यक्तीने पुन्हा फोन केला आणि दुसरा व्हिडीओ हटवण्यासाठी 22 हजारांची मागणी केली. यादरम्यान समोरच्या व्यक्तीने वृद्धाचा फोन खेचून घेतला आणि या प्रकरणाचा खुलासा झाला. यानंतर तत्सम व्यक्तीने याबाबत सायबर क्राइम पोलिसात तक्रार केली.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Delhi

    पुढील बातम्या