मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लग्नाच्या 24 व्या दिवशी सासरी आलेल्या जावयाची हत्या; दार उघडताच घातल्या गोळ्या

लग्नाच्या 24 व्या दिवशी सासरी आलेल्या जावयाची हत्या; दार उघडताच घातल्या गोळ्या

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 22 डिसेंबर : शाहजहांपूर (Uttar Pradesh News) येथे सासरी गेलेल्या नवरदेवाची गोळी घालून हत्या (Crime News) करण्यात आल्याचं वृत्त उघडकीस आलं आहे. दरवाजा उघडताच नवरदेवाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी दार उघडून कोण येत असल्याचंही पाहिलं नाही. सासरच्या मंडळींनी शेजारच्यांसोबत झालेल्या वादातून गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर सासरच्या मंडळींनी गंभीर अवस्थेत नवरदेवाला रुग्णालयात दाखल केलं. येथे डॉक्टरांनी त्याला बरेली येथे हलवलं. यानंतर बरेलीच्या रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार, 24 दिवसांपूर्वीच तरुणाचं लग्न झालं होतं. पीलीभीतमध्ये कोशल सिंह राहत होता. 28 नोव्हेंबर रोजी त्याचं प्रियंका सिंह नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. पत्नीच्या पहिल्या पाठवणीनंतर तो 17 डिसेंबर रोजी आपल्या सासरी आला होता. सासरच्या मंडळींचा शेजारच्यांसोबत सुरू होता वाद.. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा शेजारच्यांसोबत वाद सुरू होता. बुधवारी सकाळी 8 वाजता कौशलचा मेहुणा धर्मवीरच्या शेतात शेजारच्यांनी प्राणी सोडले. यामुळे त्यांचं शेत खराब झालं. यानंतर धर्मवीरने तक्रार केली, मात्र शेजारच्यांनी काहीच ऐकलं नाही. एकमेकांना धमकी देत दोघेही आपआपल्या घरी निघून गेेले. हे ही वाचा-पोट दुखतं म्हणून आजी नातीला घेऊन गेली रुग्णालयात; दोघींनाही बसला धक्का! काही वेळानंतर दोघे धर्मवीरच्या घरी पोहोचले आणि दार ठोठावलं. दरवाजा उघडताच शेजारील रामवीर आणि सत्यवीर यांनी कोण दरवाजा उघडत असल्याचं पाहिलं देखील नाही आणि थेट गोळ्या झाडल्या. त्यांनी कौशल सिंह याच्यावर गोळ्या झाडल्या. घटनेनंतर आरोपी पळून गेले. गोळ्यांचा आवाज ऐकून सासरची मंडळी तेथे पोहोचली. तर कौशल सिंह जखमी अवस्थेत होता. दोन्ही आरोपी फरार.. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दाखल झाले व त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. तर दोन्ही आरोपी फरार झाल्याचं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Crime news, Murder, Uttar pradesh

पुढील बातम्या