दोन महिन्यांपूर्वी Love Marriage झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, तरुणीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप

दोन महिन्यांपूर्वी Love Marriage झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, तरुणीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप

दोन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह (Love Marriage) केलेल्या तरुणाचा मृतदेह फासावर लटकवलेल्या अवस्थेत सापडला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनीच त्याची हत्या केल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.

  • Share this:

सोनिपत (हरयाणा), 14 डिसेंबर :  नव्या संसाराची सुरुवात झाली आणि दोन महिन्यांत तरुणाचा मृत्यू झाला. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह (Love Marriage) केलेल्या तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. 'आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याची तरुणीच्या नातेवाईकांनी हत्या केली आहे', असा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

हरियाणामधील (Haryana)  सोनिपत जिल्ह्यातील मुरथल गावातील हा सर्व प्रकार आहे.  या जिल्ह्यातल्या एका तरुणाचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. नीरज असं या मृत तरुणाचं नाव आहे. नीरजनं दोन महिन्यांपूर्वीच गावातल्या एका मुलीशी प्रेम विवाह केला होता.

हे वाचा-'हे भारत माते मला माफ कर',17 वर्षीय मुलीच्या आत्महत्येमुळे विठुरायची नगरी हादरली

काय आहे प्रकरण?

नीरजच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 'त्यांच्या मुलाने दोन महिन्यांपूर्वी गावातल्याच एका मुलीश प्रेम विवाह केला होता. त्यानंतर 20 दिवसांपूर्वी मुलीच्या वडिलांनी त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे नीरज घाबरला होता'. ही धमकी देण्याच्या घटनेस तीन आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच, मुरथल गावातल्या ओमेक्स सिटीमधील एका फ्लॅटमध्ये संदिग्ध अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. नीरज मुरथल गावातच अ‍ॅमेझॉन कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करत होता.

नीरजच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात सहा जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीरज हा दिल्ली जवळच्या टिकरी गावाचा रहिवाशी होता. तो लग्नानंतर मुरथलमध्ये राहत असे.

Published by: News18 Desk
First published: December 14, 2020, 4:42 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या