मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सासरच्या मंडळींना विषारी दूध पाजून नवी नवरी फरार; पैसे आणि दागिनेही पळवले!

सासरच्या मंडळींना विषारी दूध पाजून नवी नवरी फरार; पैसे आणि दागिनेही पळवले!

नवीन लग्न झालेली नवरी मुलगी सासरच्या मंडळींना विषारी दूध देऊन फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिला घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली आहे.

  • Published by:  News18 Desk

पानिपत, 10 डिसेंबर:  लग्नानंतर नव्या नवरीच्या रुपाने गृहलक्ष्मी घरात प्रवेश करते अशी आपल्या देशात समजूत आहे. नवरी मुलीच्या आगमनानंतर घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. नवरी मुलगी देखील सुरुवातीच्या काळात सासरच्या मंडळींवर चांगली छाप पडावी यासाठी धडपड करत असते. या साऱ्या समजुतींना तडा देणारी एक घटना धक्कादायक घटना नुकतीच उजेडात आली आहे.

हरयाणातल्या (Haryana) पानीपत (Panipat) जिल्ह्यातल्या नौल्था गावात हा प्रकार घडला आहे. या गावातल्या दिनेश यांच्या लग्नाला जेमतेम आठ दिवस झाले होते. दिनेश यांनी त्यांच्या बायकोसोबत सुखानं संसार करण्याची स्वप्न बघितली होती. मोठ्या हौसेनं तिला दागिने देखील केले. त्यावेळी आपली बायकोच घरातील सर्वांना मारण्याचा प्रयत्न करेल आणि घर लुटून नेईल याची त्यांना कल्पना नव्हती.

सुनीता असं या प्रकरणातल्या आरोपी नवरीचं नाव असून तिने घरातून पळून जाता यावं यासाठी सासरच्या मंडळींना विषारी दूध दिलं. सुदैवानं यामध्ये कोणतीही गंभीर दुर्घटना घडली नाही. आता सर्व मंडळी धोक्याच्या बाहेर आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दिनेश यांच्या तक्रारीवरुन सुनीतासह तिची बहीण बिमलेश आणि या लग्नातील मध्यस्थ परिवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुनीता सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

सासरच्या मंडळींनीच केला होता लग्नाचा खर्च

पानिपतचे रहिवाशी असलेल्या दिनेशचे उत्तराखंडमधल्या अल्मोडा जिल्ह्यातल्या सुनीताशी लग्न झाले होते. दिनेशच्या घरच्या मंडळींनी लग्नात कोणताही हुंडा घेतला नव्हता. इतकंच नाही तर त्यांनी लग्नाचा पूर्ण खर्च देखील केला.

....म्हणून अनर्थ टळला!

सासरच्या मंडळींनी सुनीताला दागिने तसेच रोख रक्मम भेट दिली होती. लग्नाला जेमतेम आठवडा झाल्यावरच सुनीताने खरा रंग दाखवला, अशी तक्रार दिनेश केली आहे. सुनीताने दिलेले विषारी दूध पिवून आई-वडील बेशुद्ध पडले होते. हॉस्पिटलमधील उपचारानंतरच ते शुद्धीवर आले, अशी माहिती देखील दिनेशनं दिली आहे. दिनेशच्या शेजारची मंडळी सुदैवानं वेळीच घरी पोहचल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

First published:

Tags: Crime news