पत्नीचे नवऱ्याच्या मित्राशीच अनैतिक संबंध, विरोध केल्याने सासूची हत्या

पत्नीचे नवऱ्याच्या मित्राशीच अनैतिक संबंध, विरोध केल्याने सासूची हत्या

सुनेने मित्राच्या मदतीने सासुची गळा दाबून हत्या केली आणि पेट्रोल टाकून तिला जाळून टाकलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर मृतदेह शाळेतच गाडून टाकला.

  • Share this:

पलवल 08 ऑक्टोंबर :  हरियानातल्या पलवलमध्ये एका हत्येच्या घटनेने खळबळ उडालीय. एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह शाळेच्या आवारात आढळून आला होता. पोलिसांनी जेव्हा घटनेचा तपास केला तेव्हा अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली. मृतक महिलेच्या सुनेने आपल्या मित्राच्या मदतीने सासुची हत्या केल्याचं उघड झालं. या महिलेच्या सुनेचे तिच्या नवऱ्याच्या मित्राशीच प्रेमसंबंध उघड झालेत. या संबधांना विरोध केल्याने त्या मित्राच्या मदतीने सुनेने सासुचा काटा काढला आणि प्रेमातला काटा दूर केला. ही माहिती जेव्हा पोलिसांना कळाली तेव्हा त्यांनाही या घटनेतलं क्रौर्य पाहून धक्का बसला. हरियानातल्या पलवल मध्ये बिसन देवी या आपल्या मुलासह राहत होत्या. होशियार असं बिसन देवी यांच्या मुलाचं नाव होतं. होशियारचं काही महिन्यांपूर्वीच प्रेमवतीशी लग्न झालं होतं. मात्र काही दिवसानंतर बिसन देवी आणि होशियारला प्रेमवतीच्या वागण्याबद्दल संशय येवू लागला. होशियारचा मित्र नरेंद्र हा कायम त्यांच्या घरी येत असे. यातून नरेंद्र आणि प्रेमवतीची ओळख झाली होती.

खळबळजनक! भाजपमधून बंडखोरी केलेल्या उमेदवाराच्या आईला धमकी

होशियार आणि बिसन देवी यांचं आणि प्रेमवतीचं कायम भांडण होत असे. या भांडणात एकदा नरेंद्रने प्रेमवतीची बाजू घेतली. त्यामुळे प्रेमवती आणि नरेंद्र यांची चांगलीच मैत्री जमली. ते दोघं फोनवर बोलू लागले. त्यांच्या मैत्रीला बिसनदेवी आणि होशियारचा विरोध होता. एक दिवशी प्रेमवतीने नरेंद्र याला फोनकरून बोलावून घेतलं. नरेंद्र हा प्रेवतीच्या घरी आला आणि तिच्या खोलित गेला. बिसनदेवीने याला विरोध केला.

या विरोधाला न जुमानता नरेंद्र आणि प्रेमवतीने बिसनदेवींना खोलीत घेतलं आणि नाक तोंड दाबून त्यांची हत्या केली. नंतर नरेंद्रने पेट्रोल आणून घराशेजारच्या पडक्या शाळेत बिसनदेवीचं शव जाळून टाकलं. मात्र ते शव पूर्णपणे न जळाल्याने त्यांनी बिसनदेवींना शाळेच्या आवारातच दफन करत पुरावा मिटविण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरेंवरही ED चा दबाव? पहिल्यांदाच दिलं उत्तर

नंतर हे प्रकरण घडकीस आलं आणि पोलिसांनी नरेंद्रला अटक केली. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच नरेंद्रने सगळं कबूल केलं. पोलिसांनी नरेंद्रला अटक केलीय तर प्रेमवती अजूनही फरार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 8, 2019, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading