Home /News /crime /

पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळला पती, न्यायासाठी भररस्त्यात घातला दंडवत

पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळला पती, न्यायासाठी भररस्त्यात घातला दंडवत

बायको (Wife) आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाने पीडित असलेल्या नव-यानं (Victim Husband) चक्क दंडवत यात्रा काढून न्यायाचं साकडं घातल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. पीडित नवऱ्यानं नं न्यायासाठी हरयणाच्या मुख्यमंत्र्यासंह (Haryana Chief Minster) अनेकांना पत्र लिहली आहेत.

पुढे वाचा ...
    हिसार, 11 डिसेंबर:  लग्नानंतर विवाहित महिलेचा हुंडा आणि अन्य कारणांसाठी छळ होण्याच्या घटना वारंवार उघडकीस आलेल्या आहेत. काही ठिकाणी याच्या उलट म्हणजे बायकोच्या त्रासाला कंटाळूनही नवऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली आहे. बायकोच्या त्रासाने पीडित असलेल्या नव-यानं चक्क दंडवत यात्रा काढून न्यायाचं साकडं घातल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. हरयणामधील (Haryana) हिस्सार (Hisar) जिल्ह्यातली ही अजब घटना आहे. या प्रकरणात पीडित नवऱ्यानं (Victim Husband) बायको आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून उचलेलं पाऊल पाहून सर्व जण थक्क झाले. आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी त्यानं पोलीस स्टेशन ते एसपी ऑफिस (SP Office) अशी दंडवत यात्रा काढली. त्याची 800 मीटर यात्रा पूर्ण झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राकेश कुमार असं या पीडित नवऱ्याचं नाव आहे. तो हिस्सारमधील खैरपूर कॉलनीतला रहिवाशी आहे. पोलीस आणि सासरची मंडळी 11 वर्षांचं वैवाहिक आयुष्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी राकेशची तक्रार आहे. त्यानं या प्रकरणात हिसार विभागाचे आयजी, हरयणाचे गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगालाही पत्र लिहलं आहे. आपल्या मेव्हणीच्या ओळखीचा विनोद नावाचा व्यक्ती बायकोला त्रास देत असल्याचा दावाही त्यानं केला. हे वाचा-6 वर्षांच्या मुलीसह आई मुलांचा सडलेला अवस्थेत आढळला मृतदेह, भिवंडीतील धक्कादायक बायकोनं दाखल केली खोटी केस ‘कपिल नावाचा एक व्यक्ती आपल्याला ब्लॅकमेल करत होता. मी त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा बायको आणि सासरच्या मंडळींनी माझ्यावर हुंडा आणि छळाची केस दाखल केली आहे. या प्रकरणानंतर बायको आणि मुलं तिच्या माहेरी राहत आहेत,’ असंही राकेशनं सांगितलं. पोलिसांनी फेटाळले आरोप सासरच्या मंडळींनी केलेल्या तक्रारीनंतर खैरपूर पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेऊन मारहाण केली असा राकेशचा आरोप आहे. त्याचबरोबर माझी तब्येत बिघडली तेंव्हा देखील पोलिसांनी कोणतेही उपचार केले नसल्याचा राकेशचा दावा आहे. न्याय मिळावा यासाठीच ही दंडवत यात्रा काढली असून या प्रकरणात गरज पड़ली तर सर्वोच्च न्यायालयात इच्छा मृत्यूची याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही राकेशनं दिला आहे. दरम्यान, राकेशचे सर्व आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत. या प्रकरणात तपास सुरु असल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या