सासू आणि मेव्हणीची केली हत्या, मृतदेहांसोबत केला SEX, त्याआधी...

सासू आणि मेव्हणीची केली हत्या, मृतदेहांसोबत केला SEX, त्याआधी...

सायको किलर नुरहसनने आपल्या सासूची हत्या केल्यानंतर पुरावा आणि मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून टाकला होता.

  • Share this:

हरियाणा, 26 सप्टेंबर : हरियाणा येथील पानीपतमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणाचे गुढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. समालखा खंडमध्ये एकापाठोपाठ 3 महिल्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा अखेर  सीआयए वन पोलिसांनी अखेर छडा लावला आहे.

डीएसपी सतीश वत्स यांनी पत्रकार परिषद घेऊन या तिहेरी हत्याकांड प्रकरणाबद्दल धक्कादायक खुलासा केला. या तिन्ही महिलांच्या हत्याकांडामागे दुसरा कोणताही सराईत आरोपी नव्हता तर मृतक महिला मधूचा पती नुरहसन होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मुख्यमंत्री साहेब, आमच्यासाठी एवढं करा... नगरच्या कामगाराचं उद्धव ठाकरेंना पत्र

पत्नीवर अनैतिक संबंधाच्या संशयावरून नुरहसनने आपल्या पत्नीची हत्या केली होती. पत्नीची हत्या केल्यानंतर पुरावा कुणाच्या हाती लागू नये म्हणून त्याने पत्नी मधूचा मृतदेह जाळून टाकला होता. तिचा चेहरा कुणी ओळखू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचून काढला होता. काही दिवसांनी या मृत महिलेचा सापळा रेल्वे ट्रॅकवर पोलिसांना सापडला होता.

पत्नीची हत्या केल्यानंतर नुरहसनने एकापाठोपाठ आपली सासू आणि 18 वर्षांची मेव्हणी मनिषाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती. एवढंच नाहीतर हत्या केल्यानंतर नुरहसनने आपल्या सासू आणि मेव्हणीच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचारही केले होते.

लस येईपर्यंत जगात काय असेल स्थिती? कोरोनाबाबत WHO नं दिला धोक्याचा इशारा

सायको किलर नुरहसनने आपल्या सासूची हत्या केल्यानंतर पुरावा आणि मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून बडशाम गावातील विहिरीत मृतदेह जाळून टाकला होता. तर मेव्हणीचा मृतदेह हा एका नाल्यात फेकून दिला होता.

आरोपी नुरसहन हा पट्टीकल्याणी गावात राहणार होता. समालखा इथं तो भाड्याच्या घरात राहत होता. 3 महिलांच्या हत्याकाडांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आरोपीवर पोलिसांनी  75000 रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.

आपण पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून त्याने वेगवेगळी ठिकाणं बदलत होता. पण, पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा छडा लावत नुरहसनला बेड्या ठोकल्यात. नुरहसनला न्यायालयात हजर केले असता त्याला 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Published by: sachin Salve
First published: September 26, 2020, 3:30 PM IST
Tags: crimeRape

ताज्या बातम्या