• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • क्रूर! किरकोळ वादातून मागास जातीच्या युवकाला तुडवून मारहाण

क्रूर! किरकोळ वादातून मागास जातीच्या युवकाला तुडवून मारहाण

य़ा विद्यार्थ्यांनी क्रूरतेची सीमा गाठली आहे. या घटनेचा आरोपींनीच रेकॉर्ड केलेला व्हिडिओही (Viral Video) व्हायरल झाला. या मारहाणीत BSc च्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

 • Share this:
  चंदिगड, 18 ऑक्टोबर: अलीकडे बारिकशा वादाचं रूपांतर कधी मोठ्या वादंगात होईल नि कसे कोणाचे प्राण घेतले जातील, याचा काही अंदाज बांधणंच जणू अवघड झालं आहे. हरियाणातल्या (Haryana mob lynching) महेंद्रगढमध्ये (Mahendragarh) नुकतीच अशी एक घटना घडली आहे. किरकोळ वादावरून मागास जातीतल्या (Bacward Class) एका विद्यार्थ्याला अन्य तरुणांनी केलेल्या जबर मारहाणीत त्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा आरोपींनीच रेकॉर्ड केलेला व्हिडिओही (Viral Video) व्हायरल झाला असून, 'दैनिक भास्कर'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. महेंद्रगढ जिल्ह्यातल्या बवाना गावात गौरव यादव (Gaurav Yadav) नावाचा एक मागास जातीतला, 18 वर्षांचा विद्यार्थी राहत होता. तो बीएस्सीचं शिक्षण घेत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर रोजी त्या परिसरात देवी जागरणाचा कार्यक्रम होता. त्या वेळी गौरवचा रवी ऊर्फ लंगडा याच्याशी काही गोष्टीवरून वाद झाला होता. त्याचा राग रवीच्या मनात होता. नऊ ऑक्टोबर रोजी दुपारी गौरव महेंद्रगढवरून बाइकने आपल्या घरी येत होता. त्याच वेळी वाटेतल्या मालडा नावाच्या गावात रवीसह कप्तान, अजय आणि मोहन आदींसह 10हून अधिक जणांनी त्याला रस्त्यात अडवलं. गौरवला काही लक्षात यायच्या आत त्याला सगळ्या बाजूंनी घेरलं गेलं. एका आरोपीने व्हिडिओ चित्रीकरण सुरू केलं, तर बाकीच्या आरोपींनी गौरवला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण (Beating) करायला सुरुवात केली. एक व्यक्ती गौरवला वाचवण्यासाठी तिथे आल्याचं व्हिडिओत दिसतं आहे; मात्र त्याला आरोपी दूर सारतात. गौरव अक्षरशः हात जोडून दयायाचना करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे; मात्र आरोपी मारहाण करत राहिले आहेत. तसंच, तो तिथेच मरू नये म्हणून आरोपी मध्येच मारहाण थांबवून त्याला पाणी पाजत होते आणि पुन्हा मारहाण सुरू करत होते. रवी गौरवला शिव्या देऊन मारहाण करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. नंतर आरोपी गौरवला एका हॉटेलच्या पाठीमागे घेऊन गेले आणि तिथेही त्यांनी त्याला मारहाण केली. तो बेशुद्ध झाल्यावर त्याला तिथेच सोडून ते पसार झाले. बापरे! 14 वर्षांच्या मुलाने खाल्ले 16 टूथब्रश; वाईट सवय सोडवण्यासाठी भयंकर उपाय काही वेळाने गौरवच्या नातेवाईकांना ही घटना कळल्यावर त्यांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं; मात्र त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. बेदम मारहाण झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं पोस्ट मॉर्टेम अहवालातूनही स्पष्ट झालं आहे. ही घटना नऊ ऑक्टोबरला घडली असली, तरी त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या प्रकरणी महेंद्रगढ पोलिसांनी सहा जणांसह आणि अनेकांवर हत्येचा आरोप लावला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी तीन वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या आहेत. विक्की उर्फ फुकरा या आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याला दोन दिवसांच्या रिमांडमध्ये पाठवलं आहे. बाकीच्यांचा शोध सुरू आहे.

  First published: