Home /News /crime /

दारुच्या नशेत तरुणांचा घराबाहेर राडा, लोकांनी अडवलं तर केली मारहाण - Video

दारुच्या नशेत तरुणांचा घराबाहेर राडा, लोकांनी अडवलं तर केली मारहाण - Video

हरयाणातील फतेहबाद (Fatehabad) जिल्ह्यातल्या तरुणांच्या टोळीनं दारुच्या नशेत जोरदार गावात जोरदार राडा केला. सुमारे अर्धा डझन तरुणांनी दारुच्या नशेत जोरदार गोंधळ घातला. त्यावेळी लोकांनी त्यांना अडवले तर त्यांनी मारहाण सुरु केली.

    फतेहबाद (हरयणा), 17 डिसेंबर : हरयाणातील (Haryana) फतेहबाद (Fatehabad) जिल्ह्यातल्या तरुणांच्या टोळीनं दारुच्या नशेत जोरदार गावात जोरदार राडा केला. गुरुनानकपुरा भागातील ही घटना आहे. या भागातील सुमारे अर्धा डझन तरुणांनी दारुच्या नशेत जोरदार गोंधळ घातला. या तरुणांनी एका घराच्या बाहेर लघवी केली. त्यावेळी घरातल्या लोकांनी त्यांना अडवले तर त्यांनी मारहाण सुरु केली. या तरुणांनी विटा आणि दगडांनी मारहाण केली. ही सर्व हुल्लडबाजी सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाली आहे. त्याचबरोबर पीडित परिवारानं या तरुणांच्या विरोधात पोलिसांकडं तक्रारही दाखल केली आहे. पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरु केला आहे. सर्व आरोपींना लवकरच अटक करु असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे वाचा-पंतप्रधान मोदी विनामास्क दिसले कार्यक्रमात; Video शेअर करुन AAP ने साधला निशाणा या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व तरुण एका घरातील लोकांवर हल्ला करत आहेत, हे स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण या तरुणांनी त्यांचं ऐकलं नाही. भरवस्तीत दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या या तरुणांना पोलिसांनी तातडीनं अटक करावी अशी मागणी पीडित परिवारातील व्यक्तींनी केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Video

    पुढील बातम्या