मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पोलीस कर्मचाऱ्याचा दारू पिऊन धिंगाणा, नशेमध्येच काढली महिलेची छेड, Video Viral

पोलीस कर्मचाऱ्याचा दारू पिऊन धिंगाणा, नशेमध्येच काढली महिलेची छेड, Video Viral

हरयणामधील (Haryana) भिवानीच्या (Bhiwani) पोलीस कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

हरयणामधील (Haryana) भिवानीच्या (Bhiwani) पोलीस कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

हरयणामधील (Haryana) भिवानीच्या (Bhiwani) पोलीस कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

  • Published by:  News18 Desk
भिवानी (हरयाणा), 21 डिसेंबर:  पोलीस (Police) कर्मचाऱ्यांच्या दादागिरीचे तसंच गुंडगिरीची अनेक उदाहरण सातत्याने समोर येत असतात. बिहारमध्ये ट्रक मालकाकडून हप्ता वसूली करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं उदाहरण ताजं आहे. त्यातच देशाच्या उत्तर भागातही पोलिसांच्या गुंडगिरीचं एक उदाहरण समोर आले आहे. हरयणामधील (Haryana) भिवानीच्या (Bhiwani) पोलीस कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. भिवानीच्या बाजारातला हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. या बाजारात एका बाईक घेऊन हरयाणा पोलीसचा (Haryana Police)   कर्मचारी दाखल होतो. तो कर्मचारी दारुच्या नशेत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो बाईक लावण्याचा प्रयत्न करतो, पण नशेत असल्याने त्याला बाईक नीट लावता येत नाही. त्यामुळे त्याची गाडी खाली पडते. त्यानंतर बाजारातल्या काही लोकांच्या मदतीने तो बाईक पुन्हा बाजूला उभी करतो. बाजारात धुमाकूळ दारुमुळे शुद्ध हरपलेला तो पोलीस कर्मचारी बाजारात त्याचे रंग दाखवू लागतो. पोलीस कर्मचाऱ्याच्या समोरुन एक रिक्षा (Rikshaw) जात असते. तो त्या रिक्षातील महिलेची छेड काढण्यास सुरुवात करतो. त्या रिक्षात त्या महिलेसोबत एक मुलगाही होता. रिक्षा चालक बाजारात रिक्षा थांबवत नाही, त्यामुळे आणखी अनर्थ टळतो. या सर्व प्रकाराचा साक्षीदार असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनेच व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. भिवानीचा पोलीस कर्मचारी दारुच्या नशेच बाजारात गोंधळ घालणारा तो कर्मचारी भिवानीचा असल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून ते आता याची चौकशी करत आहेत. या व्हिडीओवर सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भर बाजारात तमाशा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
First published:

Tags: Crime news, Video viral

पुढील बातम्या