Home /News /crime /

12वी परीक्षेची तयारी करत होती तरुणी, घरात एकटीला पाहून नराधमांनी केला सामूहिक बलात्कार; पीडितेने उचललं टोकाचं पाऊल

12वी परीक्षेची तयारी करत होती तरुणी, घरात एकटीला पाहून नराधमांनी केला सामूहिक बलात्कार; पीडितेने उचललं टोकाचं पाऊल

हरयाणातील चरखी दादरी येथील (Haryana Crime News Update) बधरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी 17 वर्षीय तरुणीला घरात एकटी पाहून तीन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape on 17 year old minor) केल्याची घटना घडली आहे.

पुढे वाचा ...
    चरखी दादरी, 02 एप्रिल: हरयाणातील चरखी दादरी येथील (Haryana Crime News Update) बधरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी 17 वर्षीय तरुणीला घरात एकटी पाहून तीन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape on 17 year old minor) केल्याची घटना घडली आहे. या भयंकर घटनेचा धक्का सहन न झाल्याने या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या मुलीच्या काकांनाही या आरोपींनी मारहाण केली आणि त्याठिकाणावरुन पळ काढला. दादरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल बोर्डाने मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बधरा उपविभागातील एका गावातील बारावीची ही विद्यार्थीनी घरी परीक्षेची तयारी करत होती. कुटुंबातील व्यक्ती यावेळी शेतात गेले होते. घरामध्ये मुलीला एकटी पाहून गावातील तीन तरुण तिच्या घरी आले आणि तिला उचलून घराच्या गच्चीवर नेले. त्याठिकाणी असणाऱ्या एका खोलीत नेऊन या नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान घटनास्थळी मुलीचे काका पोहोचले होते, पण त्यांनाही या तरुणींनी मारहाण केली आणि पळ काढला. हे वाचा-शिक्षिका बाथरूममध्ये जाण्याआधी आत ठेवायचा मोबाईल अन्...; पुण्यातील अल्पवयीन मुलाचं धक्कादायक कृत्य सामूहिक बलात्काराच्या या घटनेनंतर या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा तिचे कुटुंबीय घरी पोहोचले तोपर्यंत या तरुणीने टोकाचे पाऊल उचलले होते. तिने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. घटनेची माहिती मिळताच बधरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह दादरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेला. शवविच्छेद आणि इतर वैद्यकीय तपासणीनंतर या तरुणीवर बलात्कार झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. हे वाचा-दोन्ही बायका झाल्या एकदमच गुल, नवरा बनला एप्रिल फूल; पोलीस ठाण्यात गेलं प्रकरण या अल्पवयीन तरुणीच्या वडिलांचे अश्रू अनावर होत सांगितले की, त्यांची मुलगी बारावीची परीक्षा देत होती. ती परीक्षेच्या तयारीसाठी घरात थांबली होती आणि ते शेतात गेले होते. तिला एकटीला पाहून गावातील तीन तरुणांनी त्यांच्या मुलीसह दुष्कर्म केले. अशा अक्षम्य अपराधासाठी फाशीची शिक्षा जरी झाली तरी ती कमीच आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Crime, Gang Rape, Haryana, Rape case

    पुढील बातम्या