सोनीपत, 12 जानेवारी: दोस्त दोस्त ना रहा...तो कधी वैरी बनला हे कळण्याआधीच तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दोन सख्ख्या भावांनी मित्राचा रागाच्या भरात त्याच्या मित्रांची हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. दारू पिणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा त्याच्या मित्रासोबत वाद झाला. तू-तू मैं-मैंचा वाद टोकाला पोहोचला आणि दोघांनी मिळून मित्राला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या तरुणाचा मृत्यू झाला होता. सुशील असं या मृत तरुणाचं नाव आहे. तो मोलमजुरी करून आपलं आणि कुटुंबाचं पोट भरतो. ही धक्कादायक घटना हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील पांची जाटान गावात घडल्याची माहिती मिळाली आहे.
हे वाचा-गुजरातमधील किळसवाणा प्रकार; डिलीव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केलं लज्जास्पद कृत्य
सोनीपतच्या पांची जताना या गावात मुकेश आणि संदीप त्यांचा मित्र सुशील सोबत बसून दारू पित होते. त्यावेळी दोन भावांची सुशीलसोबत वादावादी झाली. या भावांनी काठी आणि रॉडनं सुशीलला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. धारदार शस्त्रानं त्याच्या वार केले या घटनेत सुशीलचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोनीपत पोलिस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. आरोपी असलेल्या दोन भावांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे अद्यापही ते दोघं फरार असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आधीदेखील तिघांमध्ये मोठा वाद झाला होता. मात्र त्यावेळी हा वाद काही कारणांनी थांबला यावेळी मात्र सूडाच्या भावनेतून हा वाद वाढला आणि बेदम मारहाण करून सुशीलची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी मुकेश आणि संदीपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा तपास सुरू आहे.