लखनऊ 31 मे : लग्नानंतर वरातीतील किंवा कुटुंबातील लोकांनी गोळीबार केल्याच्या अनेक घटना आजवर तुम्ही पाहिल्या किंवा वाचल्या असतील. मात्र आता एका नवरी आणि नवरदेवानेच फायरिंग केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मेरठच्या मवाना येथे नवरदेवाने कारमध्ये बसून नवरीचा हात पकडला आणि 3 सेकंदात 4 राऊंड फायरिंग केली. व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेवाच्या पोशाखात सजलेलं जोडपं लाल रंगाच्या कारमध्ये बसून गोळीबार करताना दिसलं (Harsh Firing in Wedding).
नवरीच्या बहिणीने लग्नातच केली नको ती मस्करी; परिणाम इतका वाईट झाला, की आता मागतीये मदत
व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास सुरु केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की काळ्या रंगाच्या सूटमध्ये नवरदेव कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आहे. तर शेजारीच लाल रंगाच्या लेहंग्यात नवरीबाई बसलेली आहे. यानंतर नवरदेवाने रिव्हॉल्वर हातात घेतली आणि नवरीचा हात पकडून दोघांनी 4 गोळ्या हवेत झाडल्या.
फायरिंग केल्यानंतर नवरी हसत राहिली. तर नवरदेवाने कारची स्टेअरिंग सांभाळत आपल्या नवरीला तिथून पुढे नेलं. नवरी आणि नवरदेवाला कदाचित याची कल्पना नव्हती की त्यांचं हे कृत्य किती चुकीचं आणि धोकादायक आहे. दोघांनी फक्त हर्ष फायरिंगच केली नाही तर याचा व्हिडिओही शूट करवून घेतला.
अजब प्रेमाची गजब कहाणी! चक्क प्लेनसोबत रिलेशनशिप; विमानाशीच लग्नही करतेय ही तरुणी
फायरिंगचा हा व्हिडिओ नवरदेवाने प्रोफेशनल शूट करून घेतला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच या गंभीर प्रकरणाची पोलिसांनीही दखल घेतली. एसपी आरए केशव कुमार यांचं म्हणणं आहे, की हा व्हिडिओ मवाना ठाण्याच्या क्षेत्रातील असून नवरी आणि नवरदेवाने मिळून गाडीमध्ये बसून गोळीबार केला. याचा व्हिडिओ आम्हाला मिळाला आहे. आता आम्ही व्हिडिओचा तपास करत आहोत. तपास पूर्ण होताच पोलीस याप्रकरणी केस दाखल करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gun firing, Wedding couple