बठिंडा, 11 ऑक्टोबर: ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या बठिंडा जिल्ह्याच्या पोलिस पथकावर हल्ला करण्यात आला. हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील देसुजोधा गावात पोलीस ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी गेले असता ग्रामस्थांनी पोलिसांवरच हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसंच पोलिसांवर गोळीही चालवली. या घटनेत 6 पोलीस गंभीर जखमी झाले असून एका पोलिसाला गोळीही लागली.