लग्नात गिफ्ट देण्याचा बहाणा करून आला प्रियकर, पुढे असं काही घडलं की सगळे पाहातच राहिले

लग्नात गिफ्ट देण्याचा बहाणा करून आला प्रियकर, पुढे असं काही घडलं की सगळे पाहातच राहिले

ग्न मंडपात तरुणी विवाहाचे विधी संपवून रिसेप्शनसाठी उभी होती. त्याच वेळी असं काही घडलं की सगळे पाहून थक्क झाले.

  • Share this:

हरिद्वार,27 फेब्रुवारी : लग्नाच्या मंडपात संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या नवरीच्या प्रियकरानं कानशिलात लगावल्यानं खळबळ उडाली आहे. लग्न मंडपात तरुणी विवाहाचे विधी संपवून रिसेप्शनसाठी उभी होती. त्याचवेळी गिफ्ट आणि शुभेच्छा देण्याच्या बहाण्यानं या तरुणानं तिथे प्रवेश केला आणि त्याने स्टेजवर नवरीकडे पाहून तिच्या कानशिलात लगावल्या. या संपूर्ण प्रकार काय हे कुणालाच लक्षात येईना. मात्र वधू आणि वर पक्षांकडील लोकांनी या तरुणाला पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लग्न मंडपात सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या नवरीसमोर हे लग्न मोडतंय की काय? अशी अवस्था निर्माण झाली होती.

हेही वाचा-मुलीच्या मदतीने महिलेने केला सवतीचा खून, 32 वेळा भोसकून मृतदेह जंगलात फेकला

दरम्यान हा तरुण नवरीचा प्रियकर असल्याची माहिती मिळत आहे. बरेच वर्ष हे रिलेशनशिपमध्ये होते. काही कारणांनी त्यांच्यात वाद होते मात्र तरुणींन थेट लग्न केल्यानं या तरुणाला राग अनावर झाला आणि त्याने लग्नात शुभेच्छा आणि भेटवस्तू देण्याऐवजी नवरीच्या श्रीमुखात भडकावल्या. संतप्त नातेवाईकांनी या तरुणाला धरून बेदम मारहाण केली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार इथवर थांबला नाही तर नवरी मुलीच्या भावानं आपल्यासोबत दोन तरुणांना घेऊन या प्रियकराची धुलाई केली. या घटनेमुळे लोक जमा झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत नवऱ्या मुलीचा भाऊ आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

हेही वाचा-वाट चुकलेल्या महिलेवर दोन तासांमध्ये 3 नराधमांनी केला बलात्कार

First published: February 27, 2020, 9:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading