• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • पत्नीने दिला त्रास; त्रस्त पतीने उचललं भयावह पाऊल, 24 तासात 3 वेळा केलं असं कृत्य

पत्नीने दिला त्रास; त्रस्त पतीने उचललं भयावह पाऊल, 24 तासात 3 वेळा केलं असं कृत्य

रुग्णालयात रविद्र मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्या सोबत घडलेला प्रकार वाचून तुम्हाला धक्काच बसेल.

 • Share this:
  बैतूल, 13 नोव्हेंबर : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूलमधून आलेलं प्रकरण पाहून तुम्ही हैराण (Shocking) व्हाल. रुग्णालयात बेडवर असलेल्या या व्यक्तीचं नाव रविंद्र कटारे आहे. डॉक्टर या व्यक्तीला वाचविण्यासाठी पूरेपूर प्रयत्न करीत आहेत. रविंद्र अवघ्या 35 वर्षांचा आहे. गंभीर अवस्थेत रविंद्रला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Harassment by wife Terrible step taken by the husband) या तरुणासोबत असं काही घडलं की, जे वाचून तुम्हाला धक्का बसले. या तरुणाने 24 तासात 3 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा रविंद्र खूप दारू प्यायला. दारू पिऊन त्याने आत्महत्येचा (Suicide Attempt) प्रयत्न केला. जास्त दारू प्यायल्यामुळे रविंद्र बेशुद्ध होऊन खाली कोसळला. शुद्धीवर आल्यानंतर त्याने विषारी पदार्थ खाल्ला. त्यातूनच तो बचावला. शेवटी रविंद्रने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना चिचोली पोलीस ठाणे हद्दीतील आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्रची प्रकृती गंभीर आहे. तो स्वत:ला वाचविण्यासाठी अजिबातच सहकार्य करीत नाही. डॉ अजय मेहेर यांनी सांगितलं की, रविंद्रच्या शरीरातून विष काढण्यात आलं आहे. मात्र अद्याप त्याची प्रकृती गंभीर आहे. हे ही वाचा-'राम' म्हणजे रम आणि 'कृष्ण' म्हणजे..;दारू तस्कऱ्यांकडून देवांच्या नावाचा कोडवर्ड रुग्णाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे उपचार करण्यात अडथळा येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. रविंद्रची स्वत:ची एक टॅक्सी आहे. रविंद्रचा भाऊ विनोदने सांगितलं की, आपल्या भावाच्या अशा परिस्थितीमागे त्याची पत्नी जबाबदार आहे. वहिनीमुळेच भावाने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोपी रविंद्रच्या भावाने केला आहे. वहिनीसोबत भांडण झाल्यानंतर त्याने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. रविंद्रची प्रकृती गंभीर असल्या कारणाने पोलीस त्याच्याकडून जबाब नोंदवू शकलेली नाही.

  Published by:Meenal Gangurde
  First published: