मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अचानक आलेल्या पतीला पाहून बॉयफ्रेंडला लटकवलं बाल्कनीत, हात सुटून झाला मृत्यू

अचानक आलेल्या पतीला पाहून बॉयफ्रेंडला लटकवलं बाल्कनीत, हात सुटून झाला मृत्यू

गर्लफ्रेंडचा पती जाईपर्यंत त्याने बाल्कनीला लटकून राहण्याचा निर्णय घेतला. मात्र हात सुटल्याने पाचव्या मजल्यावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.

गर्लफ्रेंडचा पती जाईपर्यंत त्याने बाल्कनीला लटकून राहण्याचा निर्णय घेतला. मात्र हात सुटल्याने पाचव्या मजल्यावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.

गर्लफ्रेंडचा पती जाईपर्यंत त्याने बाल्कनीला लटकून राहण्याचा निर्णय घेतला. मात्र हात सुटल्याने पाचव्या मजल्यावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.

  • Published by:  desk news

जयपूर, 16 डिसेंबर: आपल्या बॉयफ्रेंडसोबत (Boyfriend) असताना अचानक पती (Husband) आल्यामुळे महिलेनं बॉयफ्रेंडला बाल्कनीत लटकवून (Hanging in balcony) ठेवलं. मात्र बराच वेळ तिथं राहावं लागल्यामुळे हात सुटून त्याचा मृत्यू (Death) झालाचा खुलासा पोलिसांनी केला आहे. अचानक पतीनं रुमवर हजेरी लावल्यानंतर गोंधळ उडालेल्या महिलेनं तिच्या बॉयफ्रेंडला पाचव्या मजल्यावरील बाल्कनीत जायला सांगितलं. तिथं तो बराच वेळ लटकत राहिला. महिला बराच वेळ त्याचा हात पकडून राहिली, मात्र अखेर त्याचा हात सुटला आणि त्याला आपले प्राण गमवावे लागले.

काय आहे प्रकरण?

प्रेयसीच्या पतीला पाहून प्रियकराने बाल्कनीतून उडी मारल्याची बातमी सुरुवातीला सर्वत्र पसरली होती. मात्र प्रत्यक्षात प्रियकराने थेट उडी न मारता तो बाल्कनीला लटकून राहिला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी असणारा आजम उर्फ मोहसीन हा आइसा नावाच्या त्याच्या विवाहित प्रेयसीसोबत पळून जयपूरला आला होता. आयसाचा पती राहुल राजपूत तिचा शोध घेत होता.

पतीला ठोठावले दार

सात महिन्यांपासून घरातून गायब झालेल्या आपल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी पती राहुलनं जंग जंग पछाडलं. अखेर पत्नी राहत असलेल्या ठिकाणाचा पत्ता त्याला मिळाला. राहुल तिथं पोहोचला आणि त्याने दरवाजा ठोठावला. बाहेर आपला पती असल्याचं पाहून पत्नीनं मोहसीनला पाचव्या मजल्यावरील त्यांच्या बाल्कनीत धाडलं. राहुलला आपण दिसू नये, म्हणून तो बाल्कनीत लटकून राहिला आणि हात सुटून खाली पडला. सोसायटीच्या परिसरात तो बराच वेळ तडफडत होता.

हे वाचा - येत्या 4 दिवसांत वायव्य भारतात तीव्र थंडीची लाट; महाराष्ट्रातील तापमानही घसरणार

उपचारादरम्यान मृत्यू

आइसाने मोहसीनला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र उपचारांसाठी पैसे नसल्यामुळे ती तिथून पळून गेली. हॉस्पिटलमध्ये तिनं नोंदवलेला मोबाईल नंबर स्विच ऑफ केला आणि घरातून दागदागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन ती गायब झाली.

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी मोहसीनच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करून तो नातेवाईकांकडे सोपवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Boyfriend, Crime, Death