मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पूजा, शीतल...महिलांच्या नावानं फेसबुकवरून बनवल्या 2000 फ्रेंड, मग करू लागला असं काम

पूजा, शीतल...महिलांच्या नावानं फेसबुकवरून बनवल्या 2000 फ्रेंड, मग करू लागला असं काम

युवकाने फेसबुकवर वेगवेगळ्या मुलींच्या नावावरून बनावट खाते बनवून दोन हजाराहून अधिक मुलींना आपले मित्र (Facebook Friend) बनवले होते. यातील अनेक मुलींशी तो अश्लील संभाषण करायचा आणि त्यांना पोर्न कंटेंन्ट पाठवायचा.

युवकाने फेसबुकवर वेगवेगळ्या मुलींच्या नावावरून बनावट खाते बनवून दोन हजाराहून अधिक मुलींना आपले मित्र (Facebook Friend) बनवले होते. यातील अनेक मुलींशी तो अश्लील संभाषण करायचा आणि त्यांना पोर्न कंटेंन्ट पाठवायचा.

युवकाने फेसबुकवर वेगवेगळ्या मुलींच्या नावावरून बनावट खाते बनवून दोन हजाराहून अधिक मुलींना आपले मित्र (Facebook Friend) बनवले होते. यातील अनेक मुलींशी तो अश्लील संभाषण करायचा आणि त्यांना पोर्न कंटेंन्ट पाठवायचा.

नवी दिल्ली, 20 जून: सोशल मीडिया वापरणे सोपे असले तरी त्यातून होणाऱ्या संभाव्य धोक्यांविषयीही आपण जागृक असणे गरजेचे आहे. आजकाल लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकजण फेसबुकचा वापर करत असतात. मात्र, फेसबुकवरून अनोळखी व्यक्तीशी संबंध ठेवणे महागात पडू शकतं. बनावट खाती काढून अनेकजण फसवणूक करतात, अशाच प्रकारचे एक प्रकरण समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर युनिटने फेसबुकवरून मुलींची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला अटक केली आहे. या युवकाने फेसबुकवर वेगवेगळ्या मुलींच्या नावावरून बनावट खाते बनवून दोन हजाराहून अधिक मुलींना आपले मित्र (Facebook Friend) बनवले होते. यातील अनेक मुलींशी तो अश्लील संभाषण करायचा आणि त्यांना पोर्न कंटेंन्ट पाठवायचा.

विकास कुमार नावाचा हा तरुण जिम प्रशिक्षक असल्याचे सांगण्यात येत असून दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे त्यानं 100 हून अधिक मुलींना अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवले आहेत. पोलिसांनी पकडलेला हा आरोपी फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून मुलींना अश्लील संदेश आणि पोर्न कंटेंन्ट  पाठवत असे. एका महिलेने आरोपीविरुद्ध सागरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. संबंधित महिलेला अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवून तो त्रास देत होता. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण सायबर सेलकडे वर्ग केले.

22 वर्षांच्या आरोपी विकासने शीतल, पूजा आणि शिवानी या तीन मुलींच्या नावावरून फेसबुकवर बनावट खाते तयार केल्याचे तपासात समोर आले आहे. तो फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करायचा आणि तरुणी महिलांना शरीर दाखवण्याची मागणी करायचा, अनेकदा त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो एडिट करून त्यांना परत व्हिडिओ पाठवायचा. पोलिसांच्या तपासणीत आरोपीने सांगितलं की, तो तब्बल सात महिन्यांपासून अशी कामे करत होता.

हे वाचा - VIDEO: नवऱ्यासाठी नाही या गोष्टीसाठी तरुणीनं केलं लग्न? मंडपातील प्रकार पाहून वरातीही चक्रावले

पॉर्न पाहण्याचं व्यसन

पोलिसांनी सांगितले की, आरोपीला अश्लील व्हिडिओ पाहण्याची सवय लागली होती. म्हणूनच तो अशा गोष्टी करत असायचा. 2000 हून अधिक फेसबुक अकांऊट तपासल्यानंतर पोलीस आरोपी विकासपर्यंत पोहोचू शकले. आरोपी दिल्लीच्या द्वारका सेक्टर 22 मधील जिममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत असायचा. पोलिसांच्या तपासणीत असेही समोर आले आहे की ज्या महिला, तरुणींना तो मेसेज पाठवत होता, त्यांना त्यांची लैंगिक पसंती विचारत असायचा आणि त्यांच्याशी त्याविषयावर सतत मेसेज करत राहायचा.

First published:

Tags: Crime news, Cyber crime, Facebook