Home /News /crime /

घृणास्पद! 2 तृतीयपंथियांनी केली तरुणाशी मैत्री, ड्रग्ज देऊन रात्री प्रायव्हेट पार्ट कापले आणि...

घृणास्पद! 2 तृतीयपंथियांनी केली तरुणाशी मैत्री, ड्रग्ज देऊन रात्री प्रायव्हेट पार्ट कापले आणि...

पीडित तरुणाने असा आरोप केला आहे की, जेव्हा जेव्हा तो सोनिया त्याला घरी घेऊन जायची तेव्हा त्याला मारायची. हे काही दिवस चालूच राहिले.

    गुरदासपूर, 04 जुलै : घरात कोणतेही शुभ कार्य असो अशा वेळी आजही काही शहरांमध्ये तृतीयपंथियांना बोलवले जाते, किंवा त्यांचे म्हणणे शुभ मानले जाते. मात्र गुरदासपूरमध्ये तृतीयपंथांनी एक घृणास्पद काम केले. येथील दोन तृतीयपंथियांनी एका युवकाशी मैत्री केली, ड्रग्ज दिले आणि त्याचे प्रायव्हेट पार्ट कापले. या घटनेची माहिती युवकाच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या दोन्ही तृतीयपंथियांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूण गुरदासपूरमध्ये काम करतो. पीडित तरुण भजन, किर्तन करत असे. त्याचवेळी त्याची या दोन तृतीयपंथियांची ओळख झाली. यातील एकाचे नाव सोनिया असून तिनं या युवकाशी मैत्री केली. त्यानंतर सोनिया या युवकाला तिच्या घरी घेऊन जाऊ लागली. यावेळी सोनियानं तरूणाची ओळख तिचा मित्र असलेल्या गुरु परवीन या तृतीयपंथियांची ओळख करून दिली. वाचा-रुग्णावाहिकेअभावी तब्बल 3 तास रस्त्यावर पडून होता कोरोनाग्रस्ताचा मृतदेह दरम्यान पीडित तरुणाने असा आरोप केला आहे की, जेव्हा जेव्हा तो सोनिया त्याला घरी घेऊन जायची तेव्हा त्याला मारायची. हे काही दिवस चालूच राहिले. त्यानंतर एकेदिवशी सोनियानं तरुणाला अंमली पदार्थ दिले आणि त्याचे प्रायव्हेट पार्ट कापले. दोन दिवसानंतर जेव्हा तरुणाला जाग आली तेव्हा तो तेथून पळून गेला आणि घरी पोहोचल्यानंतर त्याने घडलेल्या घटनेची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. याप्रकरणी युवकाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वाचा-वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने जे नको होतं तेच केलं, 100 जणांचा जीव धोक्यात या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना एसएचओ गुरदासपूर जबरजित सिंग यांनी सांगितले की, पीडित तरुणाच्या आईच्या वक्तव्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन्ही तृतीयपंथांवर भादंवि कलम 326, 342, 328, 506, 120 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या क्षणी, दोन्ही तृतीयपंथिय फरार आहेत. वाचा-बापरे! हे काय? 3 महिन्यांनी घराचं दार उघडताच महिलेला बसला शॉक संकलन-प्रियांका गावडे.
    First published:

    पुढील बातम्या