Home /News /crime /

महंताने सांगितलं मी अमर आहे; अमरत्वाची परीक्षा घेण्यासाठी शिष्याने केले गुरूवर वार अन्...

महंताने सांगितलं मी अमर आहे; अमरत्वाची परीक्षा घेण्यासाठी शिष्याने केले गुरूवर वार अन्...

महंत म्हणाले, "मी सर्व विधी आणि तपश्चर्या केली आहे, मी अमर आहे. तुम्ही माझ्यावर हल्ला करा, मला काहीही होणार नाही. महंतांच्या या आदेशानंतर शिष्याने हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला

  अहमदाबाद 25 जानेवारी : भावनगरच्या गडा गावातील हनुमानजी मंदिराच्या आश्रमात बसून एक महंत म्हणाले, "मी सर्व विधी आणि तपश्चर्या केली आहे, मी अमर आहे. तुम्ही माझ्यावर हल्ला करा, मला काहीही होणार नाही. महंतांच्या या आदेशानंतर शिष्याने हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला आणि महंत तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले (Disciple Killed His Guru). यात मठाधिपतीचा मृत्यू झाल्याचं समजताच सेवकाने त्यांचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. भावनगरमधील ढासाजवळील चोसळा गावात बसलेले महंत म्हणाले, मी विधी केला आहे. मी अमर आहे. तू जर खरा सेवक असशील तर हल्ला करूनही मला काहीच होणार नाही. मठाधिपतीच्या आदेशानंतर सेवकाने त्याच्याकडे असलेल्या शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला आणि मठाधिपती रक्ताच्या थारोळ्यात पडले. मठाधिपतीचा मृत्यू होताच त्यांचा मृतदेह हत्यारासह विहिरीत टाकण्यात आला. पत्नीने प्रियकरासह मिळून केली पतीची हत्या, एका मोबाइलमुळे असा झाला खुलासा महंत यांचा खून करण्यात आला असून गावातील रहिवासी नितीन कुरजी वनोदिया याने धारदार शस्त्राने वार करून मृतदेह आश्रमातील विहिरीत फेकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याआधारे पोलिसांनी मयत महंताच्या भावाच्या तक्रारीनंतर फिर्याद नोंदवून नितीन कुरजी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. तसंच न्यायालयात हजर करून रिमांडची मागणी केली. पोलिसांनी आरोपीला तीन दिवसांच्या कोठडीत ठेवण्याची मागणी केली. त्याविरुद्ध न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची कोठडी सुनावली. महंत यांचे थोरले भाऊ प्रवीणभाई धीरूभाई अडानीया (वय 29) यांनी या घटनेप्रकरणी नितीन वनोदिया याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. झांजमेर गावचे मूळ रहिवासी असलेले रमेशभाई धीरूभाई अडानिया हे १५ वर्षांपूर्वी संन्यासी झाले. त्यांनी रामदासजी गुरु मोहनदासजी काठिया हे नाव धारण केलं. आपल्या तपस्वी जीवनात ते अधूनमधून आपल्या कुटुंबाला भेटायला घरी जात असे.

  धक्कादायक! पतीच्या परवानगीशिवाय घेतला स्मार्टफोन, पत्नीच्या हत्येची दिली सुपारी

  महंताच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आसन चौसला गावचा रहिवासी नितीन वनोदिया याने पोलिसांकडे कबुली दिली की, तो गेल्या आठ वर्षांपासून मयत महंतासोबत राहत होता आणि त्यांचा सेवक म्हणून काम करत होता. मारेकरी महंतांना खासगी व गुप्त कामांत मदत करत असे. महंत ज्याठिकाणी विधी करायचे त्याठिकाणी मारेकरीही गेला होता. याठिकाणी फक्त एकाच व्यक्तीला भेट देण्याची परवानगी होती. जिथे गुरूंनी दिलेल्या आदेशानुसार त्याने त्यांच्यावर हल्ला केला. कामुली तालुक्यातील कलमाड गावात पिठड माताजी मंदिराच्या वृद्ध महंताची यापूर्वी हत्या करण्यात आली होती. या घटनेत कलमाड येथील रहिवाशाने पूर्वीच्या वादातून साधूची हत्या केली होती. हा व्यक्ती या मंदिरात पाणी पिण्यासाठी गेला असता चपला काढण्यावरून महंतांशी त्याचा वाद झाला होता.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Crime news, Murder news

  पुढील बातम्या