मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुलाचा संतापजनक दावा, ‘मृत वडिलांनी स्वप्नात सांगितलं आईची हत्या कर’

मुलाचा संतापजनक दावा, ‘मृत वडिलांनी स्वप्नात सांगितलं आईची हत्या कर’

आरोपी तरुणानं सुरुवातीला प्रकरण दडपण्याचे सर्व प्रयत्न केले. मात्र पोलिसांनी शेजारच्यांच्या तक्रारीनंतर घटनास्थळावरुनच त्याला अटक केली. त्यानंतर त्यानं, 'आईच्या हत्येचा आदेश मृत वडिलांनी स्वप्नात येऊन दिला होता', असा युक्तीवाद केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
वडोदरा, 30 डिसेंबर: आईची हत्या करुन त्यांच्या मृतदेहाजवळ ‘ओम नम: शिवाय’ असा जप करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुणानं सुरुवातीला प्रकरण दडपण्याचे सर्व प्रयत्न केले. मात्र पोलिसांनी शेजारच्यांच्या तक्रारीनंतर घटनास्थळावरुनच त्याला अटक केली. त्यानंतर त्यानं, 'आईच्या हत्येचा आदेश मृत वडिलांनी स्वप्नात येऊन दिला होता', असा युक्तीवाद केला आहे. काय आहे प्रकरण? गुजरातमधील (Gujrat) वडोदारा (Vadodara) शहरातील हा धक्कादायक प्रकार आहे. दिव्येश बारिया असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. तो ड्रायव्हर आहे. दिव्येश शहरातल्या जाई अंबेनगर भागात त्याच्या 50 वर्षांच्या आई भिखीबेन बारिया यांच्यासोबत राहत असे. या प्रकरणाबाबत माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, ‘सोमवारी रात्री दिव्येशचा त्याच्या आईसोबत कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर त्याने भिखीबेन यांच्या शरिरावर काचेनं वार केले तसंच त्यांच्या पोटामध्ये काच खुपसली. या जीवघेण्या हल्ल्यामुळे भिखीबेन यांचा जागीच मृत्यू झाला’. या हत्येनंतर सर्व प्रकरण दडपण्यासाठी दिव्येशनं त्याच्या आईच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून ते जाळण्याचा प्रयत्न केला. दिव्येशच्या घरातील आग पाहताच शेजारी घटनास्थळावर जमा झाले. तेंव्हा तो आईच्या मृतदेहाजवळ ‘ओम नम: शिवाय’ असा जप करत होता. हे वाचा-मुलींना फसवण्यासाठी ‘त्यानं’ फेसबुकवर टाकले आर्मी युनिफॉर्ममधील खोटे फोटो हत्येनंतर संतापजनक युक्तीवाद आईची हत्या दडपण्याचे सर्व प्रकार फसल्यानंतर दिव्येशनं सांगितलेलं कारण आणखी संतापजनक आहे. “मृत वडिलांनी स्वप्नात येऊन आईला वर पाठव असं सांगितलं, त्यामुळे आपण ही हत्या केली’’, असा दावा दिव्येशनं केला आहे. पोलिसांनी दिव्येशला अटक केली असून त्याच्या आईचा मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी ताब्यात घेतला आहे.
First published:

Tags: Gujrat, Pune crime news

पुढील बातम्या