वहिनीच्या बहिणीवर जडला जीव, लग्नाला नकार दिल्यानं केली हत्या

वहिनीच्या बहिणीवर जडला जीव, लग्नाला नकार दिल्यानं केली हत्या

एकतर्फी प्रेमातून माथेफिरून वहिनीच्या बहिणीचा केला खून, आरोपी फरार पोलिसांकडून तपास सुरू

  • Share this:

जौनपूर, 28 मे : माथेफिरू एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणानं तरुणीची निर्घृण हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. वहिनीच्या बहिणीनं लग्नासाठी नकार दिल्यानं हा धक्कादायक प्रकार घडला. तरुणीवर माथेफिरून सपासप वार करून नकार दिल्याचा बदला घेतला. तरुणीची हत्या करून माथेफिरू फरार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

जमालपूर इथे राहणाऱ्या हिमलाल गुजरातमध्ये मजुरी करतात. त्यांची पत्नी, मुलगी आणि बादी कुटुंबातील सदस्या गावीच राहत आहेत. हिमालाल यांच्या मुलीचं लक्ष्मीचा विवाह नेवादा इथल्या गावातील तरुणाशी करून देण्यात आला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार हरिकंचन हा लक्ष्मीच्या छोट्या बहिणीसोबत विवाह कऱण्यावर अडून बसला होता. त्याचं एकतर्फी प्रेम होतं त्यातून लग्न करण्याची त्याची जिद्द वाढत गेली.

हे वाचा-धक्कादायक! उपचारासाठी पैसे नसल्याने मजुराने अंथरुणाला खिळलेल्या आईला जिवंत जाळलं

माथेफिरू हरिकंचननं तिच्याशी लग्न करण्याची इच्छा अनेकदा लक्ष्मीची लहान बहिण सोनला बोलून दाखवली. कोणत्याही प्रकार समजवून ऐकत नाही म्हटल्यावर त्यानं मंगळवारी रात्री सोनीच्या मानेवर कुऱ्हाडीनं सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेदरम्यान शेजारी झोपलेल्या लहान बहिणीला जाग आली तिने आरडाओरडा केल्यानं आरोपी फरार झाला.

हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान या माथेफिरूचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

हे वाचा-एका महिलेमुळे आख्ख गाव झालं सील, डॉक्टरसह 29 जण होम क्वारंटाईन

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 28, 2020, 4:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading