मोबाईलवर खेळण्याच्या नादात गमावला जीव, 11 वर्षांच्या मुलाची मित्रानं केली हत्या

मोबाईलवर खेळण्याच्या नादात गमावला जीव, 11 वर्षांच्या मुलाची मित्रानं केली हत्या

अमननं गेम खेळू नको असं सांगितलं असतानाही आकाशनं ऐकलं नाही आणि तो खेळत राहिल्यानं त्याला राग आला

  • Share this:

सूरत, 28 ऑगस्ट : मोबाईल गेम खेळण्याच्या नादात आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. हा धक्कादायक प्रकार गुजरातच्या सूरतमध्ये घडला आहे. हा 11 वर्षांचा मुलगा त्याच्या मित्राच्या मोबाईलवर गेम खेळायचा. ही गोष्ट घरच्यांना माहीतही नव्हती. गेम खेळण्याच्या रागातून 19 वर्षांच्या युवकानं 11 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील रहिवासी अमन शिवहरे हा सूरतमधील केमिकल कंपनीत सहाय्यक म्हणून काम करायचा. 10 दिवसांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. अमनने चिडून आकाशची गळा दाबून हत्या केली. आकाश त्याच्या फोनवर गेम खेळत असताना नको खेळू म्हणून सांगूनही ऐकत नव्हता.

मिळालेल्या माहितीनुसार आकाश अमनच्या घरी आला होता आणि तो त्याच्या मोबाईलवर गेम खेळत बसला होता. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. रागाच्या भरात अमननं आकाशची गळा दाबून हत्या केली.

हे वाचा-प्रेम प्रकरण उघड होण्याच्या भीतीने मित्रानच काढला जिवाभावाच्या मित्राचा काटा!

अमननं गेम खेळू नको असं सांगितलं असतानाही आकाशनं ऐकलं नाही आणि तो खेळत राहिल्यानं त्याला राग आला. अमनने आकाशचा गळा आवळून खून केला. नंतर पकडल्याच्या भीतीने त्याने मृतदेहाला शालने झाकून पलंगाखाली लपवून ठेवला. आकाशचे वडील एका सुरक्षा एजन्सीमध्ये काम करतात. आकाश घरी न आल्यावर त्यांनी पोलिसांना हरवल्याची तक्रार दाखल केली. आकाशला शोधण्यासाठी अमनही त्यांच्यासोबत होता. संध्याकाळी जेव्हा अमनचा रूम पार्टनर खोलीत पोहोचला तेव्हा त्याने पलंगाखाली मृतदेह पाहून पोलिसांना कळवलं.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 28, 2020, 1:07 PM IST

ताज्या बातम्या