Home /News /crime /

धक्कादायक! मासिक पाळीच्या दरम्यान लग्न केलं म्हणून नवऱ्यानं मागितला घटस्फोट

धक्कादायक! मासिक पाळीच्या दरम्यान लग्न केलं म्हणून नवऱ्यानं मागितला घटस्फोट

लग्नानंतर काही धार्मिक विधी करण्यासाठी मंदिरात गेल्यानंतर पत्नीनं ही गोष्ट सर्वांना सांगितली. तिच्या या वागण्यामुळे आपला विश्वासघात झाला आहे, असा आरोप तक्रारदार व्यक्तीनं केला आहे.

    वडोदरा, 25 डिसेंबर : आपल्या सभोवताली अनेकदा अशा घटना घडतात की ज्याचा आपण कधीही विचार केलेला नसतो. लग्नानंतर तयार झालेलं पती-पत्नीचं नातं हे अनेकदा अगदी शुल्लक कारणांमुळे तुटते. ‘रोजच्या जगण्यातील अगदी स्वाभाविक गोष्टींमुळे लग्नाचं नातं कसं तुटू शकतं?’, असा प्रश्न पडावा असं एक प्रकरण आता उघडकीस आले आहे. मासिक पाळीच्या काळात लग्न केले म्हणून एका व्यक्तीनं पत्नीकडे घटस्फोट (Divorce) मागितल्याची धक्कादायक घटना आता उघड झाली आहे. गुजरातमधील (Gujrat)  वडोदरामधील (Vadodara) हे प्रकरण आहे. वडोदरातील एका व्यक्तीचं जानेवारी महिन्यात लग्न झाले होते. ‘पत्नीच्या मासिक पाळीच्या दरम्यान हे लग्न झालं. पत्नीने सुरुवातीला ही माहिती लपवून ठेवली होती. लग्नानंतर काही धार्मिक विधी करण्यासाठी मंदिरात गेल्यानंतर पत्नीनं ही गोष्ट सर्वांना सांगितली. तिच्या या वागण्यामुळे आपला विश्वासघात झाला आहे, असा आरोप तक्रारदार व्यक्तीने केला आहे. पत्नीवर अनेक गंभीर आरोप या व्यक्तीनं घटस्फोटासाठी दाखल केलेल्या अर्जात पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “घर खर्चासाठी पैसे देऊ नये यासाठी पत्नी आपल्यावर कायम दबाव टाकत असे. तिला महागड्या वस्तूंचा नाद होता. ती नेहमी या वस्तूंची खरेदी करण्याचा हट्ट करत असे. लग्नानंतर घरात एसी बसवण्यात यावा असा तिने तगादा लावला होता. या विषयावर तिचे सासू-सासऱ्यांशी अनेकदा भांडण झाले. आपल्याकडे एसीसाठी पैसे नव्हते. या वस्तुस्थितीचा विचार न करता ती रागावून माहेरी निघून गेली.” आत्महत्येचा प्रयत्न “पत्नी आता आपल्याकडून घर खर्चासाठी दरमहा पाच हजार रुपयांची मागणी करत आहे. तिच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता,’’ असा दावाही या व्यक्तीनं तक्रारीत केला आहे. या प्रकरणात तक्रारदार पतीनं पत्नीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्येही फिर्याद दाखल केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या