मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /भावाचा बदला! 13 वर्षांच्या मुलानं केली 12 वर्षांच्या मुलाची हत्या

भावाचा बदला! 13 वर्षांच्या मुलानं केली 12 वर्षांच्या मुलाची हत्या

एका 13 वर्षाच्या मुलानं आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी 12 वर्षाच्या मुलाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

एका 13 वर्षाच्या मुलानं आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी 12 वर्षाच्या मुलाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

एका 13 वर्षाच्या मुलानं आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी 12 वर्षाच्या मुलाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सुरत, 30 जानेवारी : बहिण-भावांचं नातं हे सर्वात जास्त प्रेमाचं असतं असं मानलं जातं. गरज पडल्यावर भावडं एकमेकांच्या मदतीला धावून जातात. संकटकाळात त्यांची ढाल बनतात. मात्र कधी कधी हे प्रेम इतकं आंधळं होतं, की त्यामध्ये चुकीचं कृत्य देखील घडतं. भावडांच्या प्रेमात आंधळी झालेली व्यक्ती कोणताही विचार न करता ती चूक केली जाते.

एका 13 वर्षाच्या मुलानं आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी 12 वर्षाच्या मुलाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातमधील सुरत (Surat) शहरातील ही घटना आहे. 12 वर्षाच्या चिमुकल्याची दंडुक्यानं मारहाण करत हत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन तो दंडुका जप्त केला आहे. या प्रकरणात हत्येचा गुन्हा (Murder Case) दाखल करण्यात आला आहे.

(वाचा - VIDEO:प्रियकराने विवाहित महिलेवर कात्रीने केला जोरदार हल्ला, थरार CCTV मध्ये कैद)

काय आहे प्रकरण?

या विषयावर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, सुरतमधील पांडसेरा भागात एका बारा वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. बारा वर्षाच्या मुलाची हत्या कोण करणार?  असा प्रश्न त्यांना सतावत होता. पोलिसांच्या तपासामध्ये जे सत्य समोर आलं त्यानं सारेच चक्रावून गेले. एका 13 वर्षाच्या मुलानंच ही हत्या केल्याचं या तपासात स्पष्ट झालं.

(वाचा - 10 वर्षे आईच्या मृतदेहासोबत एकाच छताखाली राहत होती मुलगी; कारण ऐकून परिसरात खळबळ)

या प्रकरणातला आरोपीचा लहान भाऊ आणि मृत मुलगा यांच्यात भांडण झालं होतं. या भांडणात 8 वर्षाच्या मुलाला मृत मुलानं शिवी दिली होती. लहान भावाबद्दल घडलेला हा प्रकार समजताच त्याचा मोठा भाऊ चांगलाच संतपाला होता. त्यानं या घटनेचा बदला घेण्याचा निश्चय केला. याच संतापात पांडसेरा भागात त्यानं 12 वर्षाच्या मुलाची हत्या केली.

घराबाहेर खेळत होता चिमुकला

या प्रकरणातील मृत चिमुकला त्याच्या घराबाहेर खेळत होता. काही वेळानं त्याच्या आईला तो दिसला नाही. त्यामुळे तिनं सर्वत्र त्याचा शोध घेतला. त्यावेळी घराजवळच्या झुडपांमध्ये त्यांना मुलाचा मृतदेह सापडला.

First published:

Tags: Crime, Crime news, Gujrat