CCTV :कमलेश तिवारी हत्याकांड : हत्येचं कारण प्रक्षोभक भाषण? गुजरातमधून तिघांना अटक

CCTV :कमलेश तिवारी हत्याकांड : हत्येचं कारण प्रक्षोभक भाषण? गुजरातमधून तिघांना अटक

हिंदू महासभेचे नेते आणि माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्याकांड प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे.

  • Share this:

लखनौ, 19 ऑक्टोबर : हिंदू महासभेचे नेते आणि माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्याकांड प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. पोलीस महानिदेशक (DGP)ओपी सिंह यांनी शनिवारी (19 ऑक्टोबर) यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. केवळ 24 तासांच्या आतच तिवारी यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सर्व मारेकऱ्यांची ओळखदेखील पटवण्यात आली आहे. तपासादरम्यान या हत्याकांड प्रकरणाचे धागेदोरे गुजरातशी संबंधित असल्याचे निदर्शनास आलं. हे हत्यांकाड उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे घडलं आहे. डीजीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार,'कमलेश तिवारी यांची धारदार शस्त्रांनी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. अद्यापपर्यंत या प्रकरणामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे का? याची माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाही'. गुजरात पोलिसांसह संयुक्तरित्या करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती डीजीपी सिंह यांनी दिली.

(वाचा : संशयाचं भूत.. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या गळ्यावर कटरने केले वार)

21 आणि 23 वर्षांचे तरुण आहेत आरोपी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मोहसिन शेख सलीम आणि फैजान (वय 21 वर्ष) अशी आरोपींची नावं आहेत. यातील मोहसिन शेख सलीम हा गुजरातमधील रहिवासी असून तो एका साडीच्या दुकानावर काम करतो. तर फैजान सूरतमधील जिलानी अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. या दोघांव्यतिरिक्त आणखी एक संशयित रशीद अहमद पठाण यालाही ताब्यात घेण्यात आलं होतं. पण चौकशीनंतर त्याला सोडण्यात आलं'.

(वाचा : सहावीतल्या मुलाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या, महिलेने केला होता 'हा' आरोप)

हत्येचं मुख्य कारण भडकाऊ भाषण - डीजीपी

डीजीपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, '2015मध्ये दोन मौलानांनी कमलेशवर बक्षीस जाहीर केलं होतं. या दोघांचीही चौकशी सुरू आहे. जातीय भावना भडकवून हे हत्याकांड घडवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या हत्याकांडाचे धागेदोरे गुजरातशी संबंधित असल्याचं काही पुरावेदेखील मिळाले आहेत. यानंतर गुजरातच्या डीजीपींनाही तातडीनं माहिती देण्यात आली. सीसीटीव्हीच्या मदतीनं तिवारींच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात आला'.

kamlesh CCTV

(वाचा : सेक्स व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, अर्ध्या तासात पाठवले 30 हजार ई-मेल)

मौलानांचीही कसून चौकशी

डीजीपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्याकांडाचा कट रचणाऱ्या मौलाना अनवारुल आणि मुफ्ती काझमी यांचीही चौकशी सुरू आहे. लखनौ, बिजनौर आणि सूरतमध्ये या प्रकरणाचे नेमके धागेदोरे काय आहेत? याचा शोध घेतला जात आहे. रशीद पठाणनं या हत्या प्रकरणाचा कट रचला. मौलाना मोहसिन शेखनं तिवारी यांच्या जुन्या वादग्रस्त विधानांचा दाखला देत भडकावण्याचं काम केलं, अशी माहिती समोर आली आहे.

भरदिवसा गळा चिरून हत्या

हिंदू महासभेचे माजी अध्यक्षाची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कमलेश तिवारी असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तिवारी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. पण डॉक्टरांनुसार कमलेश तिवारी यांची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या केली गेली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील नाका परिसरातील ही धक्कादायक घटना आहे.

हिंदू समाज पार्टीची केली होती स्थापना

कमलेश तिवारी यांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषवले आहे. तिवारी यांनी पैगंबर मोहम्मद साहब यांच्याविरोधात टिप्पणी केल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी त्यांना अटक करून तुरूंगातही रवानगी करण्यात आली होती. यानंतर 2017मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंदू समाज पार्टीची स्थापना केली होती.

VIDEO: अमृता फडणवीसांनी जाहीर केला दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचा निकाल

First published: October 19, 2019, 4:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading