Home /News /crime /

नवरा निघाला नीच!; बायकोचे फोटो एस्कॉर्ट सर्व्हिस साईटवर केले अपलोड

नवरा निघाला नीच!; बायकोचे फोटो एस्कॉर्ट सर्व्हिस साईटवर केले अपलोड

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेला नवऱ्याच्या नीच स्वभावाचा अनुभव आला. या महिलेच्या नवऱ्याने दोघांमधील भांडणानंतर नीचपणाच्या मर्यादा ओलांडत आपल्या बायकोचे फोटो एस्कॉर्ट (Escort) सर्व्हिस देणाऱ्या साईटवर अपलोड केले.

    वडोदरा, 9 डिसेंबर : मानवी नातेसंबंधामध्ये नवरा-बायकोचे नाते हे मोठे महत्वाचे मानले जाते. लग्नानंतर दोघे जण एकत्र संसार सुरु करतात. या संसारात लहान खटके उडणे ही सामान्य गोष्ट असली तरी काहीवेळा ती भांडणं टोकाला जातात. त्यातूनच विवाहित महिलेच्या छळासंबंधी अनेक गुन्हे आजवर नोंदवली गेली आहेत. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेला नवऱ्याच्या नीच स्वभावाचा अनुभव आला.  या महिलेच्या नवऱ्याने दोघांमधील भांडणानंतर नीचपणाच्या मर्यादा ओलांडत आपल्या बायकोचे फोटो एस्कॉर्ट (Escort) सर्व्हिस देणाऱ्या साईटवर अपलोड केले. नवऱ्याच्या या नीच प्रवृत्तीचा बायकोला धक्का बसला असून तिने या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. लग्नानंतर लगेच भांडणाला सुरुवात गुजरातमधील (Gujrat) वडोदरामध्ये (Vadodara) नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. या प्रकरणातील पीडित महिलेच्या नवऱ्याचं नाव नाव प्रकाश आहे. त्या दोघांचे नोव्हेंबर 2017 साली लग्न झाले. दोघांमध्ये लग्नानंतर लगेच भांडणाला सुरुवात झाली. या भांडणातूनच त्याचा पत्नीने प्रकाशचे घर सोडले आणि ती माहेरी राहू लागली. (हे वाचा-संतापजनक! जेवणाला हात लावला म्हणून दलित तरुणाची हत्या) बायकोला मोठा धक्का! “प्रकाशने फेब्रुवारी महिन्यात चार वेगवेगळ्या विवाहविषयक साईटवर सुरुवातीला माझे फोटो अपलोड केले होते. मी माहेरी असताना त्याने हा उद्योग केला,’’ अशी पत्नीची तक्रार आहे. प्रकाशचे एवढ्यावरच समाधान झाले नाही, तर त्याने पुढे जाऊन तिचे फोटो एस्कॉर्ट साईटवर अपलोड केले. अशी तक्रार या महिलेने सायबर क्राईमचा तपास करणाऱ्या पोलिसांकडे केली आहे. हा प्रकार समजल्यानंतर आपल्याला मोठा धक्का बसल्याचं तिनं सांगितलं. प्रकाशने मित्रमंडळींमध्ये देखील आपल्याबदद्दल गैरसमज पसरवल्याचा आरोप पत्नीने केला आहे. (हे वाचा-4 महिन्यापूर्वीच झाले होते लग्न, चारित्र्यावर संशय घेऊन आवळला पत्नीचा गळा) वडोदाराच्या मकारपूरा पोलिस स्टेशनमध्ये प्रकाश आणि त्याच्या सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त प्रकाशच नाही तर प्रकाशचे आई-वडील आणि लहान भावाने देखील आपला छळ केल्याची तक्रार या महिलेने केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Crime news

    पुढील बातम्या