निर्दयीपणाचा कळस! महिलेच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकून काढला VIDEO

निर्दयीपणाचा कळस! महिलेच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकून काढला VIDEO

आरोपीने ब्लॅकमेल करून 50 लाख रुपयांची मागितली खंडणी

  • Share this:

अहमदाबाद, 01 फेब्रुवारी: 22 वर्षीय युवतीचा महिलेनंच छळ करून व्हिडिओ काढल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीला छळणाऱ्याही तीन महिला असल्याची माहिती मिळाली आहे. 22 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकून त्याचा व्हिडिओ तयार करून खंडणी मागितल्याचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार गुजरातमधील अहमदाबाद इथे घडला. पीडित महिला वेदनेनं ओरडत असताना तिचा व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करण्यात आलं. या प्रकरणी पीडित महिलेनं तीन महिलांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

गुरुवारी सकाळी पीडित महिला घरातून दुकानावर जात असताना आरोपी महिलेनं तिला आपल्या स्कुटरवर बसवून जबरदस्ती घरी नेलं आणि तीन महिलांनी मिळून तिला डांबून ठेवलं. त्यानंतर तिच्या गुप्तांगात मिरची पूड टाकली आणि तिचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर आरोपी महिलांनी पीडितेकडे 50 लाख रुपयांची मागणी केली होती.

हेही वाचा-इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर वोडका पार्टी आणि नंतर मित्रानंच केला बलात्कार

डोक्यात राग आणि मनात सूडाची भावना

पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार ती एका कापडाच्या दुकानात काम करत होती. त्यावेळी 4 वर्षांपूर्वी ती एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर त्यांच्यातील कुरबुरी वाढल्यानं दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. दोघांनी आपलं नातं तोडलं. पुढे तरुणानं लग्न केलं मात्र पीडित तरुणी अजूनही त्याच्यासाठी झुरत होती. दोन महिन्यांआधी तिला पुन्हा त्याचा फोन आला आणि चांगले प्रेमसंबंध निर्माण झाले. या संपूर्ण प्रकरणाची कुणकुण तरुणाच्या पत्नीला लागली आणि त्या रागातून आरोपी महिलेनं तरुणीवरील सूडाची भावना अधिक खोलवर पक्की झाली.

या प्रकरणी पीडित महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीवरून तीनही महिलांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा-शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळीमा, दिव्यांग मुलाचा शिक्षिकेने छळ केल्याचा आरोप

First published: February 1, 2020, 12:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या