मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जे कुणालाच जमलं नाही ते गुजरातने करुन दाखवलं, बलात्काराच्या आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा

जे कुणालाच जमलं नाही ते गुजरातने करुन दाखवलं, बलात्काराच्या आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा

चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमाला गुजरातमध्ये महिन्याभरात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमाला गुजरातमध्ये महिन्याभरात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमाला गुजरातमध्ये महिन्याभरात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  • Published by:  Chetan Patil

गांधीनगर, 7 डिसेंबर : गुजरातच्या (Gujarat) सूरत (Surat) शहरात गेल्या महिन्यात एका चार वर्षीय चिमुकलीसोबत प्रचंड संतापजनक कृत्य करण्यात आलं होतं. आरोपीने चिमुकलीवर अत्याचार (Rape) करुन तिची हत्या (Murder) केली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कोर्टाने आरोपीला आज फाशीची शिक्षा सुनावली आहे. बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट व्हावी यासाठी गुजरातच्या पोलीस यंत्रणेसह न्याय व्यवस्थेच्या या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त करण्यात आलं आहे. कारण घटनेच्या अवघ्या एक महिन्यातच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरातच्या कारवाईच्या या मॉडेलचं खरंतर प्रत्येक राज्याने अंगीकारण केलं पाहिजे. तरच पीडितांना न्याय मिळेल, अशी भावना आता सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही सूरत शहरात 4 नोव्हेंबरला घडली होती. आरोपीने अवघ्या 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर तिची हत्या केली होती. त्यामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं होतं. अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीवर इतकं निर्घृणपणे कुणी कसं वागू शकतो? असा प्रश्न नागरिकांना सतावत होता. नागरिकांनी या घटनेप्रकरणी आरोपींना लवकरात लवकर पकडून पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी केली होती.

हेही वाचा : गुंगीचं औषध देत 17 मुलींवर लैंगिक अत्याचार; प्रॅक्टिकलच्या बहाण्याने नेलं अन्...

पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

विशेष म्हणजे पोलिसांनी या भयानक घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई सुरु केली होती. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मिळालेले पुरावे आणि इतर माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीच्या तातडीने मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला होता. आरोपीला पकडल्यानंतर नागरिकांनी या प्रकरणातील संबंधित खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी देखील या संतापजनक कृत्याचं गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई केली.

अवघ्या आठ दिवसांनी चार्जशीट दाखल

पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी चार्जशीट दाखल केली होती. त्यानंतर कोर्टात 19 नोव्हेंबरला सुनावणी सुरु झाली होती. या प्रकरणी जवळपास दोन आठवडा सुनावणी झाली. त्यानंतर आज शेवट कोर्टाने आपला निकाल जाहीर केला. या निकालात कोर्टाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच पीडित कुटुंबाला 20 लाखांची भरपाई देण्याचे देखील आदेश कोर्टाने दिले.

हेही वाचा : त्रास देणाऱ्या कोंबडीला मांजरीने अशी घडवली अद्दल; VIDEO पाहून वाटेल कौतुक

गुजरातच्या कारवाईच्या या मॉडेलची देशात आवश्यकता

कोर्टाच्या या निकालावर सूरतच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा सुनावण्याची गुजरातमधील ही पहिलीच वेळ नाही. गुजरातमध्ये याआधी दोन प्रकरणांमध्ये पोलीस आणि प्रशासनाने महिन्याभरात आरोपीला शिक्षा सुनावली आहे. महिन्याभरात शिक्षा सुनावल्याची ही तिसरी घटना घडली आहे. गुजरातच्या या मॉडेलचा देशातील अनेक राज्यांमध्ये अवलंब केला तर गुन्हेगारी कमी करण्यात मदत होईल. त्यामुळे आता इतर राज्य या प्रकरणातून काही बोध घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published: