मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Asaram Case: आसारामला मोठा झटका! महिलेने केलेल्या आरोपांत दोषी, उद्या सुनावणार शिक्षा

Asaram Case: आसारामला मोठा झटका! महिलेने केलेल्या आरोपांत दोषी, उद्या सुनावणार शिक्षा

आसारामला मोठा झटका!

आसारामला मोठा झटका!

Asaram Case: आसाराम यांच्यावर बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे आदी आरोप आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अहमदाबाद, 30 जानेवारी : स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू याला गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. आसाराम बापूला सत्र न्यायाधीश डीके सोनी मंगळवारी (31 जानेवारी) शिक्षा सुनावणार आहेत. आसारामच्या पत्नीसह अन्य सहा आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. देशात कधीकाळी आसाराम बापू हा मोठा अध्यात्मिक गुरू होता. अहमदाबादच्या चांदखेडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, आसारामने 2001 ते 2006 दरम्यान पीडित महिलेवर अनेक वेळा बलात्कार केला, जेव्हा ती अहमदाबादच्या बाहेरील मोटेरा येथील त्याच्या आश्रमात राहत होती.

सरकारी वकील आर सी कोडेकर यांनी सोमवारी सांगितले की, "न्यायालयाने फिर्यादीचा खटला स्वीकारला असून आसारामवर कलम 376 (2) (सी), 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि भारतीय दंड संहितेच्या बेकायदेशीर ओलीत ठवणे, अशा कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे." ऑक्टोबर 2013 मध्ये, सुरतमधील एका महिलेने आसाराम आणि इतर सात जणांविरुद्ध बलात्कार आणि बेकायदेशीर कैदेत ठेवल्याचा गुन्हा दाखल केला होता. खटला सुरू असताना एका आरोपीचा मृत्यू झाला. जुलै 2014 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

वचा - कोल्हापुरात शिक्षकाने नववी-दहावीतील मुलींना दाखवले पॉर्न व्हिडीओ; विद्यार्थिनी म्हणाल्या..

आसाराम याच्यावर बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे आदी आरोप आहेत. आसारामची पत्नी आणि मुलीसह अन्य सहा सहआरोपींवर प्रवृत्त करणे, ओलीस ठेवणे आणि कट रचण्याचे आरोप होते, त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दोन बहिणींनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे सुरत पोलिसांनी 6 ऑक्टोबर 2021 रोजी एफआयआर नोंदवला होता. एक गुन्हा आसारामवर तर दुसरा त्यांचा मुलगा नारायण साई याच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता. दोघांवर बलात्कार, लैंगिक छळ, बेकायदेशीर ओलीस ठेवण्यासह अनेक कलमे लावण्यात आली आहेत.

आसारामविरोधात दाखल केलेली तक्रार नंतर अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. कारण ही घटना तेथील आश्रमात घडली. विशेष म्हणजे, जोधपूर (राजस्थान) येथील न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो सध्या जोधपूर तुरुंगात आहे.

First published:

Tags: Crime, Gujrat