हिस्सार, 23 नोव्हेंबर: लग्नाच्या सोहळ्याचा (Groom's friend died in the firing during marriage celebrations) आनंद द्विगुणित करण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात नवरदेवाच्या मित्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या रात्री सुरू असलेल्या विधींदरम्यान अनेकजण फटाक्यांची आतषबाजी करतात, तर काही ठिकाणी (Firing to celebrate festival) बंदुका आणि रिव्हॉल्व्हर यातून फायरिंग करणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. याच प्रकारातून वऱ्हाडी मंडळी फायरिंग करत असताना गोळी लागल्यामुळे (Death of a friend of groom) वराच्या मित्राचा मृत्यू झाला.
लग्नात सुरू होतं फायरिंग
राजस्थानच्या हिस्सार भागात विनय नावाच्या तरुणाच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सोनू नावाचा मित्रही हजर होता. वराच्या जवळच उभा राहून तो या लग्नसोहळ्याचा आनंद लुटत होता. लग्नाचे वेगवेगळे विधी वऱ्हाडी मंडळी आतषबाजी करून साजरे करत होती. त्यापैकी काहीजणांकडे बंदुकाही होत्या. ही मंडळी बंदुकीतून गोळ्या झाडून आनंद साजरा करत होती.
रंगाचा झाला बेरंग
हा आनंद साजरा करत असतानाच एकाच्या बंदुकीतून सुटलेली गोळी थेट सोनूच्या छातीत घुसली आणि तो खाली कोसळला. लग्नसमारंभ अचानक ठ्प्प झाला आणि एकच शांतता पसरली. वऱ्हाडी मंडळींनी तातडीनं सोनूला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. लग्नात झाडलेली गोळी हवेत झाडण्याऐवजी ती समोरच्या दिशेनं झाडली गेली. त्यामुळे ती सोनूच्या छातीत घुसून त्याचा मृत्यू झाला.
हे वाचा - बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने केला भलताच हट्ट; नवरीची पोलिसांत धाव
पोलीस तपास सुरू
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून सोनूचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून देण्यात आला आहे. या प्रकरणात नेमकी कुणी गोळी झाडली आणि ज्याच्या पिस्तुलातून ही गोळी झाडली गेली, त्याच्याकडे परवाना होता का, या बाबींचा पोलीस तपास करत आहेत. त्यानंतर या प्रकरणात अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Gun firing, Rajasthan