Home /News /crime /

रिअल लाईफमधील ‘थप्पड’, वधूचा Dance पाहून वराने दिली कानशिलात आणि घडलं महानाट्य

रिअल लाईफमधील ‘थप्पड’, वधूचा Dance पाहून वराने दिली कानशिलात आणि घडलं महानाट्य

आपली होणारी वधू सर्वांसमोर डान्स करत लग्नाच्या हॉलमध्ये आली, याचा वराला इतका संताप आला की त्याने थेट तिला थप्पड लगावली. त्यानंतरच्या काही मिनिटांत मोठं महानाट्य घडलं.

    चेन्नई, 21 जानेवारी: लग्न समारंभात (Marriage) वराने (Bride) वधूला (Groom) सर्वांदेखत थप्पड (Slap) लगावल्यामुळे हे लग्न मोडल्याची आणि त्याच जागी दुसरं लग्न झाल्याची नाट्यमय घटना समोर आली आहे. लग्नसमारंभ सुरू असताना वधूनं तिच्या मैत्रिणींसोबत डान्स करत लग्नाच्या हॉलमध्ये एन्ट्री केली. ही एन्ट्री न आवडल्याने वराचा संताप झाला आणि त्याने सर्वांदेखल वधूच्या कानशिलात भडकावली. ही घटना सर्वांसमोर घडल्याने दोन्ही बाजूकडील नातेवाईक आक्रमक झाले आणि अखेर वधूनं त्या वराशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अशी घडली घटना तमिळनाडूतील कुड्डालोर भागात राहणाऱ्या एका तरुणीचं लग्न ठरलं होतं. 19 जानेवारी रोजी या लग्नाचा मुहूर्त होता. त्यापूर्वीच काही महिने दोघांचा साखरपुडा झाला होता आणि लग्नसमारंभासाठी अनेक पाहुणेमंडळींना आमंत्रित करण्यात आलं होतं. एका व्यापाऱ्याची मुलगी असणारी वधू डिझायनर असून ती स्वतःचं सलोन चालवत असल्याची माहिती आहे. लग्नाच्या कार्यालयात आपण कसा प्रवेश करायचा, याचा बेत तिने खूप दिवस आधीपासूनच आखला होता. काही मैत्रिणींसोबत तिने एका गाण्यावर डान्स बसवला होता आणि नाचत नाचत थिएटरमध्ये प्रवेश करण्याचा बेत आखला होता. डान्स पाहून झाला संताप लग्नात सर्व वऱ्हाडी मंडळी हजर असताना ठरल्याप्रमाणे आपल्या मैत्रिणींसोबत डान्स करत वधूने लग्नाच्या हॉलमध्ये प्रवेश केला. ही सरप्राईज एन्ट्री पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र वराला काही हा प्रकार आवडला नाही. आपल्या होणाऱ्या पत्नीनं अशा प्रकारे सर्वांसमोर नाचत नाचत हॉलमध्ये प्रवेश करावा, ही बाब पचनी न पडलेल्या वराने तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. वाद घालता घालता भांडण विकोपाला गेलं आणि त्याने सर्वांसमक्ष तिला थप्पड लगावली. वधूनेही दिलं प्रत्युत्तर सर्वांदेखत झालेला हा अपमान सहन न करता वधूनेही त्याच क्षणी वराच्या कानशिलात भडकावत उत्तर दिलं. हा प्रकार पाहून मुलीचे वडील पुढे आले आणि त्यांनी त्यांनी वराला जाब विचारला. सर्वांदेखत आणि आपल्यासमोर आपल्या मुलीला मारहाण करणाऱ्या मुलासोबत आपल्याला मुलीचं लग्न लावून देण्याच इच्छाच नसल्याचं सांगत त्यांनी वराला कार्यालयातून निघून जाण्याचे आदेश दिले. हे वाचा- घाना: खाणीसाठी स्फोटके घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट,17 जणांचा मृत्यू तर 59 जखमी नातेवाईकासोबत झालं लग्न लग्नाच्या त्याच हॉलमध्ये, त्याच मुहूर्तावर आपल्या मुलीचं लग्न होईल, अशी घोषणा त्यांनी केली आणि मुलीच्या परिचयात असणारा नात्यातीलच एक तरुण तिच्याशी लग्न करायला तयार झाला. त्यानंतर त्याच हॉलमध्ये, त्याच मुहूर्तावर मुलीच्या सहमतीने वाजतगाजत तिचं लग्न लावण्यात आलं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bride, Crime, Father, Marriage

    पुढील बातम्या