मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने केला भलताच हट्ट; लग्नाच्या दिवशीच नवरीची पोलिसांत धाव

बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने केला भलताच हट्ट; लग्नाच्या दिवशीच नवरीची पोलिसांत धाव

नवरीच्या कुटुंबीयांनी नवरदेवाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. दोन्ही पक्ष दुपारपासून संध्याकाळपर्यंत पोलीस ठाण्यातच होते.

  • Published by:  Kiran Pharate

रायपूर 23 नोव्हेंबर : लग्नाचं एक अतिशय अजब प्रकरण (Weird Wedding Story) समोर आलं आहे. या घटनेत नवरदेवाला हुंड्यात ऑडी (Audi Car in Dowry) न मिळाल्याने तो लग्नाच्या दिवशीच घरातून फरार झाला. नवरदेव फरार झाल्याची बातमी समजताच नवरीच्या कुटुंबीयांना धक्का बसला. नवरदेवाला हुंडा म्हणून 40 लाख रूपये किंवा ऑडी कार हवी होती. या तरुणावर नवरीला मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. नवरीच्या कुटुंबीयांनी नवरदेवाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. दोन्ही पक्ष दुपारपासून संध्याकाळपर्यंत पोलीस ठाण्यातच होते. ही घटना छत्तीसगडच्या बिलासपूरमधील सकरी ठाण्यातील आहे.

मंगलाच्या भाटिया रेसिडन्सी येथील एका व्यक्तीने आपल्या मुलीचं लग्न प्रकाश द्विवेदी याच्यासोबत ठरवलं. प्रकाश रायपूरमध्ये कार शोरूममध्ये काम करत असे. हे लग्न जमल्यानंतर 11 ऑक्टोबरला साखरपुडा झाला. यादरम्यानच लग्नाची तारीखही ठरली.

ठरल्याप्रमाणे 19 नोव्हेंबरला टीळा आणि 20 तारखेला वरातीचं स्वागत होणार होतं. दोन्ही बाजूकडील लोक सकरीच्या गणेश वाटिका येथे लग्नासाठी पोहोचले. शनिवारी वरातीच्या स्वागताची तयार चाललेली असतानाच सकाळी दहा वाजता नवरदेव गायब झाला. नवरदेव फरार झाल्याची बातमी समजताच नवरीकडील लोक हैराण झाले. त्यांनी नवरदेवाचे वडील नरेंद्र यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. दुपारपासून संध्याकाळपर्यंत दोन्ही बाजूचे लोक ठाण्यात होते. मात्र नवरदेव परतला नाही. लग्नासाठी यायला निघालेले लोक रस्त्यातूनच परत गेले.

ठाण्यात पोहोचलेल्या नवरीनं आणि तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं की हे लग्न जमल्यानंतर शुक्रवारी नवरदेवाला २ लाख रुपये आणि दोन सोन्याच्या अंगठ्याही दिल्या. यानंतरही प्रकाश ऑडी कार किंवा ४० रुपये मागत होता. हे देण्यास नकार दिल्याने काही न सांगताच तो फरार झाला.

First published:

Tags: Marriage, Wedding