चंदीगड 07 डिसेंबर : हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील एका पीएचडी पास तरुणीचे फेरे पैसे आणि फॉर्च्यूनर गाडीची (Fortuner in Dowry) मागणी पूर्ण न केल्याने मध्येच थांबवण्यात आले. संपूर्ण रात्र नवरी फेऱ्यांसाठी वाट पाहत बसली. सकाळी पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांसमोर सकाळी ८ वाजता मुलाकडचे लोक फेऱ्यांसाठी तयार झाले. यानंतर मुलीकडच्या लोकांनी या सर्वांना सवाल केला की वारंवार आम्ही म्हणत असूनही तुम्ही फेऱ्यासाठी आला नाहीत आणि पोलिसांना पाहताच फेऱ्यासाठी उभा राहिलात. नंतर तुम्ही काहीही करू शकता.
जिंद येथील नसीब कृषी विभागात सरकारी नोकरीला आहे. ज्या मुलीसोबत त्याचं लग्न होतं ती मुलगीही शिक्षण विभागात कार्यरत आहे. दोघेही सरकारी नोकरीवर आहेत. कोमलचे वडील एनडीआरआयमध्ये कार्यरत आहेत. मुलीचं संगोपन, शिक्षण पूर्ण करून पायावर उभा राहिल्यानंतर ते कर्नालमध्ये आपल्या मुलीचं लग्न करत होते. मुलीचे कुटुंबीय मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांनी असा आरोप केला, की जेव्हा हे लग्न ठरलं तेव्हा कोणत्याही प्रकारची हुंड्याची मागणी झालेली नव्हती.
हेही वाचा - उत्साहात लग्नमंडपात पोहोचला नवरदेव; स्वागत सोडाच, लाथा-बुक्क्यांचा मिळाला प्रसाद
मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, वरात आल्यानंतर विवाह सोहळा होता. त्यांनी होणाऱ्या जावयाला अंगठी आणि सोन्याची साखळी घातली. लग्नाची प्रक्रिया आटोपल्यानंतर नवरदेव जाग्यावरुन उठला आणि गळ्यातील साखळी काढून फेकून दिली. आम्ही त्याला हात जोडून विनंती करू लागलो तेव्हा समजलं की त्या मुलाच्या मेहुण्याला आणि भावालाही सोन्याची साखळी हवी होती.
मुलीच्या वडिलांनी पुढे सांगितलं की यासाठी आम्ही आणखी दोन दिवस देण्याची विनंती केली. मात्र यासाठी नकार देत नवरदेवाने शिवीगाळ केली आणि फेरे घेण्यासही नकार दिला. यानंतर 20 लाख व फॉर्च्युनर गाडीची मागणी करण्यात आली. बराच वेळ मुलाकडचे लोक काहीतरी चर्चा करत राहिले. आम्ही त्यांना बोलवत राहिलो मात्र त्यांनी काहीच ऐकलं नाही. माझी मुलगी LLB, LLM, Ph.D आहे. ती नोकरी करते. मुलीला नवरदेव असं सोडून गेल्यावर बापाने काय करावे? असा सवालही त्यांनी केला.
मंगळवारी सकाळपर्यंत दोन्ही पक्षात चर्चा सुरूच होती. अखेर पोलिसांना बोलवण्यात आलं. मुलीच्या आईने सांगितलं की, तिने मुलाकडच्या लोकांचे पायही पकडले. मात्र कोणीही ऐकायला तयार नव्हतं. जावईदेखील कारची मागणी करत होता. वराचा मेहुणा दिल्ली पोलिसांत आहे. त्यानेही इथे येत म्हटलं की तुम्ही गाडी देण्याची बोली केली होती आणि आता आपला शब्द पाळला नाही.
हेही वाचा - 4 गर्लफ्रेंडच्या प्रेमात आंधळा झाला तरूण; आजीचाच कापला गळा, धक्कादायक खुलासा
पोलिसांनी सांगितलं, की घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मुलीकडील लोक गाडी, पैसे आणि दागिन्यांची मागणी केल्याचा आरोप करत आहेत. तर मुलाकडच्यांनी सांगितलं की आम्ही हुंडा घेण्यास नकार दिला. गळ्यात साखळीही काढून दिली होती की ती दहा दिवसांनंतर द्या. मात्र यावरुनच भांडण सुरू झालं. आता या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Wedding