लग्नाच्या स्टेजवरच नवरीला आली चक्कर; कारण समजताच वरातीसह नवरदेवानं काढला पळ

नवरीबाई (Bride) सजून वरमाळेच्या कार्यक्रमासाठी वाट पाहत बसली, मात्र नवरदेव (Groom) वरातीसह फरार झाला. नवरदेवाच्या नातेवाईकांनी नवरीला भूत बाधा झाल्याचा आरोप करत लग्नास (Marriage) नकार दिला.

नवरीबाई (Bride) सजून वरमाळेच्या कार्यक्रमासाठी वाट पाहत बसली, मात्र नवरदेव (Groom) वरातीसह फरार झाला. नवरदेवाच्या नातेवाईकांनी नवरीला भूत बाधा झाल्याचा आरोप करत लग्नास (Marriage) नकार दिला.

  • Share this:
    लखनऊ 18 जून : लग्नसमारंभ म्हटलं, की डोळ्यासमोर येतं ते अत्यंत उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण. मात्र, अनेक लग्नसमारंभातील (Marriage Function) घटना या नवरी अन् नवरदेवासोबत कुटुंबीयांसाठीही अत्यंत वाईट ठरतात. अशीच काहीशी घटना आता समोर आली आहे. या घटनेमध्ये नवरीबाई सजून वरमाळेच्या कार्यक्रमासाठी वाट पाहत बसली, मात्र नवरदेव वरातीसह फरार झाला. नवरदेवाच्या नातेवाईकांनी नवरीला भूत बाधा झाल्याचा आरोप करत लग्नास नकार दिला. तर, नवरीकडच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, हुंड्याची (Dowry) मागणी पूर्ण न झाल्यानं वरात माघारी गेली आहे. नवरीच्या वडिलांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या कन्नौजमधील सिकंदरपूर क्षेत्राती जगतपुर गावातील आहे. पतीचं संतापजनक कृत्य; बनावट FB खातं काढून पत्नीचे अश्लील व्हिडिओ केले व्हायरल मैनपुरीच्या नवीगंज येथून धर्म सिंह कठेरिया जगतपूर गावात बुधवारी रात्री वरात घेऊन आला होता. नवरी शिवानीच्या घरात आनंदाचं वातावरण होतं. प्रचंड उकाडा आणि तहान लागल्यानं नवरीला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. ही घटना पाहून नवरदेवाचा एक नातेवाईक भडकला. त्यानं म्हटलं, की आजारी मुलीसोबत लग्न लावलं जात आहे. त्यानं म्हटलं, की मला आधीच माहिती होतं, की मुलीला भूत बाधा होते. यानंतर संधी साधून नवरदेव आणि वराती तिथून फरार झाले. या गोष्टीची भनक लागताच शिवानीच्या नातेवाईकांनी पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली. मोबाइल नसल्यानं ऑनलाईन शिक्षण थांबलं; नांदेडमधील मजुराच्या मुलीनं केली आत्महत्या शिवानीचे वडील गिरीशचंद कठेरिया यांचं म्हणणं आहे, की हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यानं वरात परत गेली आहे. हुंडा म्हणून आधीच त्यांनी टीव्ही, फ्रीज, कूलर, कपाट, बाईक, बेट या वस्तूंची व्यवस्था केली होती. मात्र, लग्नाच्या दिवशीच मुलाकडच्या लोकांनी आणखी 50 हजार रुपयांची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्यानं वरात माघारी गेल्याचं नवरीच्या वडिलांचं म्हणणं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published: