भरमंडपात नवऱ्याने घेतला नवरीचा जीव; पाहुण्यांसमोर बेदम मारहाण करून हत्या

भरमंडपात नवऱ्याने घेतला नवरीचा जीव; पाहुण्यांसमोर बेदम मारहाण करून हत्या

सात जन्म साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याने नव आयुष्याचं स्वप्नं पाहणाऱ्या नववधूचं लग्नाच्या दिवशीच आयुष्य संपवलं.

  • Share this:

मॉस्को, 05 ऑक्टोबर : लग्नानंतर नवरा आणि सासरच्या मंडळींचे खरे चेहरे समोर येतात. सुरुवातीला नववधूला आपल्या डोक्यावर बसवणारी ही मंडळी हळूहळू प्रत्येक कारणावरून तिचा छळ करू लागतात. मात्र रशियात (russia) अशी घटना घडली आहे, जिथं लग्नाच्या रिसेप्शनमध्येच नवऱ्याचं खरं रूप समोर आलं आहे. नवऱ्याने पाहुण्यांसमोरच नववधूचा (groom beat bride) जीव घेतला. पाहुण्यांसमोरच बायकोला बेदम मारून तिची हत्या केली आहे.

रशियाच्या नोवोसिबिर्स्कमधील ही धक्कादायक घटना आहे. स्टीफन डोलगिख असं आरोपीचं नाव आहे. तर ओकसाना असं या नववधूचं नाव आहे. 33 वर्षांचा स्टीफन आणि 36 वर्षांची ओकसाना दोघांनीही लग्न केलं आणि त्याच दिवशी लग्नाची पार्टी ठेवली. त्यावेळी दोघांमध्ये भांडणं झाली आणि स्टीफनने ओकसानाला इतकं मारलं ही तिचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाची पार्टी सुरू होती. त्यावेळी नवरा-नवरीमध्ये काही कारणामुळे भांडणं झाली. नवऱ्याला खूप राग आला. त्याला हा राग अनावर झाला आणि त्याने थेट मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा - सोशल मीडिया वापरणारी बायको नको! बंगाली वकिलानं ठेवली लग्नासाठी अजब अट

लग्नाच्या पार्टीत दोघांचेही नातेवाईक आणि पाहुणे उपस्थित होते. मात्र स्टीफनचं हे रूप पाहिल्यानंतर त्या सर्वांनाच घाम फुटला. पुढे जाऊन ओकसानाला वाचवावा याचं धाडसच कुणामध्ये झालं नाही. भीतीपोटी ओकसानाला वाचवण्यासाठी कुणीही पुढे गेलं नाही. ओकसानाला वाचवण्यासाठी कुणीच मध्यस्थी केली नाही. ज्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला.

हे वाचा - पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पत्नीविरोधात गुन्हा दाखल

मिरर यूकेने दिलेल्या बातमीनुसार स्टिफनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान त्याने ही पहिलीच हत्या केली नाही तर याआधीही त्याने हत्या केली होती, अशी माहिती मिळाली आहे. त्या हत्येसाठी त्याला शिक्षाही झाली होती. तो तुरुंगात होता. जेलमध्ये असताना त्याची आणि ओकसानाची भेट झाल्याचं सांगितलं जातं आहे. यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. दोघांनीही लग्न केलं. मात्र ओकसानाचं हे एक पाऊल तिच्या जीवावर बेतेल असं तिला स्वप्नातही वाटलं नसेल. नव्या आयुष्याला सुरुवात करण्याआधीच तिच्या आयुष्याचा अंत झाला.

Published by: Priya Lad
First published: October 5, 2020, 10:45 PM IST

ताज्या बातम्या