मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /छत्तीसगडच्या पोलिसांना मोठं यश; चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा केला खात्मा

छत्तीसगडच्या पोलिसांना मोठं यश; चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा केला खात्मा

या दोन्ही नक्षलवाद्यांवर पोलिसांनी लाखोंची बक्षीसं जाहीर केली होती.

या दोन्ही नक्षलवाद्यांवर पोलिसांनी लाखोंची बक्षीसं जाहीर केली होती.

या दोन्ही नक्षलवाद्यांवर पोलिसांनी लाखोंची बक्षीसं जाहीर केली होती.

छत्तीसगड, 20 मार्च : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. या माओवाद्यांवर लाखो रुपयांची बक्षीस जाहीर करण्यात आली होती. छत्तीसगडच्या जंगलात नक्षलवाद्यांविरोधात ही चकमक झाली होती. यावेळी घटनास्थळाहून 5 किलो वजनाचा बॉम्ब, दोन पिस्तूली जप्त करण्यात आल्या आहेत. (Chhattisgarh police Two notorious Naxalites killed in encounter)

मृतकांमध्ये उपकमांडर मडावी हडमा आणि जनमिलीशिया कमांडर आयताचा समावेश आहे. या दोघांवर हत्या जाळपोळीसह अनेक गंभीर गुन्हा दाखल आहेत. अजूमही घटनास्थळावर शोध मोहीम सुरू आहे. या दोघांवर लाखोंची बक्षीसं जाहीर करण्यात आली आहेत.

हे ही वाचा-शिवसेना उप तालुकाप्रमुखाच्या आत्महत्येमुळं खळबळ, प्रेयसीच्या घरी घेतला गळफास

दरम्यान एका न्यूज वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील नक्षल्यांचा प्रभाव असलेल्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून एका  गावकऱ्याची हत्या केली. दंतेवाडा जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं की, जिल्ह्याच्या पोलीस ठाणे हद्दीत मंगनार गावाजवळ पोलिसांना एक मृतदेह सापडला आहे. पोलीस अधिकाऱअयांनी सांगितलं की, पोलिसांना मंगनार गावाजवळील रस्त्यावर एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस तेथे रवाना झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्यातच छत्तीसगडमध्ये पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे.

First published:
top videos

    Tags: Chhatisgarh, Crime news, India, Police, Police Encounter, Success