मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! अल्पवयीन मुलानं चिरला आजीचा गळा; मग मित्रांना केला व्हिडिओ कॉल अन्...

धक्कादायक! अल्पवयीन मुलानं चिरला आजीचा गळा; मग मित्रांना केला व्हिडिओ कॉल अन्...

धक्कादायक! अल्पवयीन मुलानं चिरला आजीचा गळा; मग मित्रांना केला व्हिडिओ कॉल अन्...

धक्कादायक! अल्पवयीन मुलानं चिरला आजीचा गळा; मग मित्रांना केला व्हिडिओ कॉल अन्...

Grandson Killed Grandmother in Delhi: पैसे न दिल्यानं एका 84 वर्षांच्या महिलेची तिच्याच अल्पवयीन नातवानं सर्जिकल ब्लेडने गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रांना व्हिडिओ कॉल करून आजीचा मृतदेह दाखविला.

  • Published by:  Suraj Sakunde
दिल्ली, 11 जुलै: राजधानी दिल्लीच्या शालिमार बाग परिसरात एका 84 वर्षांच्या महिलेची तिच्याच अल्पवयीन नातवानं सर्जिकल ब्लेडनं गळा चिरून हत्या केली (Minor boy killed Grandmother). हत्येनंतर अल्पवयीन मुलानं आपल्या मित्रांना व्हिडिओ कॉल करून आजीचा मृतदेह दाखविला. अल्पवयीन मुलानं आजीकडे पैसे मागितले होते. परंतु आजीने पैसे देण्यासाठी नकार दिल्यामुळं त्यानं आजीला ठार मारलं (Murder) आणि पैसेही लुटले. या प्रकरणात अल्पवयीन मुलांसोबतच त्याच्या मित्रांनाही पोलिसांनी अटक (accused Arrested by Police) केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी दिल्लीतील शालिमार बाग भागात एका 84 वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांना चौकशीदरम्यान समजलं की, मृत वृद्ध महिलेनं अलीकडेच आपली मालमत्ता विकली आणि त्यातून आपल्या सर्व मुलांना कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणी सेटल केलं होतं. ती स्वतः मात्र शालिमार बाग परिसरातील घरात एकटीच राहत होती. पोलिसांनी तिच्या मुलांना विचारलं असता, त्यांनी कुणावरही खूनाचा संशय व्यक्त केला नाही. त्यामुळं पोलिसांना हत्येचे धागेदोरे सापडत नव्हते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून उलगडा- पोलिसांनी महिलेच्या घराभोवती असलेल्या सीसीटीव्ही तपासले असता या फूटेजमध्ये पांढर्‍या टॉवेलनं चेहरा झाकलेल्या एका संशयित व्यक्तीनं रात्री साडेनऊच्या सुमारास तिच्या घरात प्रवेश केल्याचं आढळलं. यानंतर, तो व्यक्ती रात्री 11:20 वाजता बाहेर आला. यानंतर, पुन्हा रात्री 12:20 वाजता घरात प्रवेश करताना दिसला आणि काही काळानंतर पुन्हा बाहेर पडला. हेही वाचा: लॉजवर नेत तरुणाने प्रेयसीसोबत केलं भयानक कृत्य; पुण्यातील धक्कादायक प्रकार पोलिसांनी सीसीटीसीमध्ये संशयित व्यक्तीला कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे बारकाईने पाहिले. जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी संशयिताची ओळख उघडकीस आणली, तेव्हा पोलिसांच्या पायाखाली जमीनच सरकली. संशयित हा इतर कोणी नसून तो वृद्ध महिलेचा नातू होता. या तपासणीदरम्यान तो शाळेत होता. नातवानंच केला खून- पोलिसांनी मृत महिलेच्या नातवाला शाळेतून ताब्यात घेतलं. मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने धक्कादायक खुलासा केला. त्यानं पोलिसांना सांगितलं की, त्याचे शाळेत त्याचे चार मित्र बनले होते. अल्पवयीन मुलानं त्या मित्रांकडून पैसे उसणे घेतले होते, जे त्यानं परत केले नव्हते. अल्पवयीन मुलाने त्या चौघांना सांगितले की, माझ्याकडे पैसे नाहीत आणि तिने अलीकडेच प्रॉपर्टी विकली आहे. त्यामुळं तिच्याकडे खूप पैसे आहेत. परंतु माझी आजी एकटी राहते. तिला पैसे मागू. ती पैसे देऊ शकते. जर तिनं पैसे दिले नाहीत, तर तिला ठार करून पैसे आणता येतील. त्यानंतर या सर्वांनी एक प्लॅन बनवला. प्लॅननुसार हा अल्पवयीन मुलगा आजीच्या घरी पोहोचला आणि तिच्याकडे पैसे मागितले. जेव्हा आजीने नकार दिला तेव्हा त्या अल्पवयीन मुलाने आजीला ढकलले. यानंतर, सर्जिकल ब्लेडने गळा चिरून तिला ठार मारले. हत्येनंतर मित्रांना व्हिडिओ कॉलवर मृतदेह दाखवला आणि हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर त्यानं मित्रांना कॉल करून एके ठिकाणी बोलवलं आणि आजीच्या घरातून लुटून आणलेले सुमारे 1 लाख पन्नास हजार रुपये देऊन कर्जाची रक्कम परत केली. यानंतर अल्पवयीन मुलगा पुन्हा आजीच्या घरी परत आला आणि आजी जिवंत तर नाही ना याची खात्री केली. हेही वाचा: Video : पुण्याच्या दोन नृत्यांगनांचं किळसवाणं कृत्य; लग्नात अश्लील हावभाव करीत बीभत्स डान्स, अखेर गुन्हा दाखल पोलिसांनी अल्पवयीन मुलाला घेतलं ताब्यात- अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या मित्रांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सर्जिकल ब्लेड, रक्ताचे माखलेले कपडे, 50 हजार रुपये, स्विफ्ट डिजायर कार इ. गोष्टीही ताब्यात घेतल्या.
First published:

Tags: Crime, Crime news, Murder, Murder news, Police

पुढील बातम्या