Home /News /crime /

पोट दुखतं म्हणून आजी नातीला घेऊन गेली रुग्णालयात; डॉक्टरांनी सांगितल्यानंतर दोघीही हादरल्या!

पोट दुखतं म्हणून आजी नातीला घेऊन गेली रुग्णालयात; डॉक्टरांनी सांगितल्यानंतर दोघीही हादरल्या!

आईच्या निधनानंतर मुलगी आपल्या आजीसोबत राहत होती.

    इंदूर, 22 डिसेंबर : मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh News) जबलपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. जबलपूरमधील एका 11 वीत शिकणारी विद्यार्थीनी आईच्या निधनानंतर आपल्या आजीसोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात दुखत असल्याने आजी तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. तिथं गेल्यावर आजीने जे काही ऐकलं त्यानंतर तिला धक्काच बसला. डॉक्टरांनी विद्यार्थीनी 6 महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगितलं. त्यांच्याजवळ भाड्याने राहणाऱ्या एका तरुणाने विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचं समोर आलं. कुंडम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय विद्यार्थिनीचं लहानपणीच निधन झालं होतं. वडील नरसिंहपूर गोटेगाव गावात शिक्षक आहेत. ती आजीसोबत कुंडम येथे राहत होती. तिची आजीदेखील शिक्षिका होती. आजीच्या घरी दोन वर्षांपासून रोहित नावाच्या एका तरुणाची बहिण प्रियंका भाड्याने राहत होती. रोहित यांचं पीडितेच्या घरी येणं-जाणं होतं. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, कोचिंग आणि शाळेत येत-जात असताना रोहीत वारंवार पीडितेला तिच्यावर प्रेम करीत असल्याचं सांगत होता. तिने त्याला आधीच नकार दिला होता. जून 2021 रोजी प्रियंकाने एक पार्टी ठेवली होती. जेवण छतावर होतं. पीडिता खोलीत एकटीच होती. त्यावेळी रोहित तेथे पोहोचला. यानंतर रोहितने तिच्यावर बलात्कार केला. लाजेखातर तिने कोणाला काहीच सांगितलं नाही, असं पीडितेने सांगितलं. हे ही वाचा-मित्रांनीच दिली नराधमला साथ, जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार जूननंतर तिला पाळी येत नव्हती. यानंतर तिने गावातील एका डॉक्टरला दाखवलं होतं. काही महिन्यांनंतर तिची पोटदुखी वाढू लागली. यानंतर तिने आजीला याबद्दल सांगितलं. जेव्हा तिला डॉक्टरकडे दाखवलं तोपर्यंत ती 6 महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. यानंतर तिला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयाच्या सूचनेनंतर पोलिसांनी आरोपीविरोघात बलात्कार, धमकी आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Madhya pradesh, Rape

    पुढील बातम्या