Home /News /crime /

अवैध संबंधात होती नातीची बाधा, आजीनेच घडवून आणला चिमुकलीचा खून

अवैध संबंधात होती नातीची बाधा, आजीनेच घडवून आणला चिमुकलीचा खून

आपल्या बॉयफ्रेंडसोबतच्या अनैतिक संबंधात बाधा ठरणाऱ्या तीन वर्षांच्या नातीची तिच्याच आजीनं हत्या केली आहे.

    नोएडा, 3 जानेवारी: मित्रासोबतच्या (Friend) अनैतिक संबंधात (extra marital affair) अडथळा (Obstacle) ठरणाऱ्या आपल्या नातीचा (granddaughter) तिच्या सख्ख्या आजीनं (Grandmother) खून (Murder) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या महिलेचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. मात्र या संबंधांमध्ये तिची नात अडथळा आणत असल्यामुळे आजी त्रासली होती. ही कटकट कायमची संपवण्याच्या उद्देशानं आपल्या बॉयफ्रेंडला सुपारी देऊन तिनं आपल्या नातीचा खून केला. अशी घडली घटना उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये राहणाऱ्या एका महिलेचे हेमंत नावाच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. या महिलेच्या मुलाला एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. तो तुरुंगात गेल्यामुळे त्याची पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली होती. घरात केवळ आजी आणि तिची 3 वर्षांची नात या दोघीच राहत होत्या. या काळात महिलेचा संबंध हेमंत नावाच्या साधारण पन्नाशीतील व्यक्तीशी आला. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांचे अनैतिक संबंधही प्रस्थापित झाले. करायचं होतं लग्न महिलेला हेमंतसोबत लग्न करण्याची इच्छा होती. घरात असणारी 3 वर्षांची नात या संबंधांमध्ये अडथळा ठरत होती. त्यामुळे तिची हत्या करून आपल्या प्रियकरासोबत त्या घरात राहण्याचा डाव महिलेनं आखला. आपल्या नातीचा खून करण्याची सूचना महिलेनं हेमंतला दिली आणि हेमंत तिच्या नातीला घेऊन गेला. हे वाचा-आई, मला माफ कर' सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची आत्महत्या, नाशकातील खळबळजनक घटना बलात्कार आणि खून हेमंत महिलेच्या नातीला एका बांधकाम सुरू असलेल्या निर्जन इमारतीत घेऊन गेला. तिच्यावर अगोदर त्याने बलात्कार केला आणि नंतर तिचा खून केला. पोलिसांना या इमारतीत मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर तपास करत असताना आजीवरच संशय आला. त्यानंतर एकेक धागादोरा पकडत पोलिसांनी हेमंतला अटक केली. अनैतिक संबंधांसाठी निष्पाप नातीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या हेमंतला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेची नेमकी यात काय भूमिका होती, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Murder, Police, Women extramarital affair

    पुढील बातम्या