एकतर्फी प्रेमातून आजी-नातवाची केली होती हत्या, दुसऱ्याच दिवशी आरोपीने घेतली रेल्वेखाली उडी!

एकतर्फी प्रेमातून आजी-नातवाची केली होती हत्या, दुसऱ्याच दिवशी आरोपीने घेतली रेल्वेखाली उडी!

घरात घुसून मोईनने आजी आणि नातवावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. आजीला वाचवण्यासाठी 10 वर्षांचा मोहन धावून आला असता मोईनने त्याच्यावरही चाकूने वार केले.

  • Share this:

नागपूर, 11 डिसेंबर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये खुनाच्या दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. एकतर्फी प्रेमसंबंधात अडचण निर्माण करीत असल्याने एका अल्पवयीन आरोपीने तरुणीचा भाऊ आणि आजीचा धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांच्या हत्येनंतर आरोपीनेही आत्महत्या केली.

गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीत हजारी पहाड इथंही घटना घडली आहे. मोईन खान असं या आरोपीचं नाव आहे. लक्ष्मी मारुती धुर्वे (60) आणि यश मोहन धुर्वे (10) अशी मृतांची नावे आहेत.

व्वा क्या बात है! सलूनमध्ये स्वत:च्याच हातानी कापले केस, VIDEO पाहून व्हाल हैराण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंटिंगचे काम करणारा मोहन धुर्वे कृष्णानगरजवळ असलेल्या हजारी पहाड येथे राहतो. भाऊ यश पाचव्या वर्गात तर मुलगी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकते. वर्षभरापूर्वी विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन आरोपीच्या संपर्कात आली. तो तिला नियमित फोन करीत होता. मात्र, आजीचा या प्रेमाला विरोध असल्याने चिडून आरोपी मोईनने आजी आणि नातवाची हत्या केली.

घरात घुसून मोईनने आजी आणि नातवावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. आजीला वाचवण्यासाठी 10 वर्षांचा मोहन धावून आला असता मोईनने त्याच्यावरही चाकूने वार केले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.

लग्नाचा तिसरा वाढदिवस, विराटचा अनुष्कासाठी 'खास' मेसेज

आजी आणि नातवाची हत्या करून मोईन फरार झाला होता. आपल्या हातातून घडलेल्या घटनेमुळे मोईन अस्वस्थ होता. त्यानंतर आज सकाळी मोईनने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Published by: sachin Salve
First published: December 11, 2020, 3:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या