मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नातीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या आजोबांचा खून, गावगुंडांकडून बेदम मारहाण

नातीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या आजोबांचा खून, गावगुंडांकडून बेदम मारहाण

नातीची छेड काढणाऱ्या गावगुंडांनी याचा जाब विचारल्याबद्दल तिच्या आजोबांचा खून केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

नातीची छेड काढणाऱ्या गावगुंडांनी याचा जाब विचारल्याबद्दल तिच्या आजोबांचा खून केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

नातीची छेड काढणाऱ्या गावगुंडांनी याचा जाब विचारल्याबद्दल तिच्या आजोबांचा खून केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

पटना, 24 डिसेंबर: आपल्या नातीची (Grand Daughter) छेड (Teasing) काढल्याचा जाब विचारायला गेलेल्या आजोबांची (Grandfather) गावगुंडांकडून हत्या (Murder) करण्यात आली आहे. गावातील आपल्या दुकानात बसलेल्या नातीची एका गुंडाने छेड काढली. ही बाब मुलीने तिच्या वडिलांना आणि आजोबांना (Father and Grandfather) सांगितली. हे दोघंही याचा जाब विचारत असताना तरुणांनी त्यांना जबर मारहाण करायला सुरुवात केली. बिहारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुंडगिरीतून हत्या होण्याच्या घटना वाढत चाललल्याचं यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

अशी केली हत्या

बिहारच्या आरा भागात 65 वर्षांचे भरत साह कुटुंबीयांसोबत राहत असत. आपल्या गावात दुकान चालवून ते गुजराण करीत असत. दुकानात काही वेळा त्यांची 12 वर्षांची नात बसत असे आणि दुकानाचा व्यवहार सांभाळत असे. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे त्यांची नात दुकानात बसली होती. त्यावेळी गावातील एक गुंड तिथे आला आणि त्याने तिची छेड काढली. या गोष्टीची घटना मुलीने तिचे वडील आणि आजोबांकडे गेली.

जाब विचारताच केली मारहाण

या घटनेचा जाब विचारण्यासाठी मुलीचे आजोबा आणि वडील गुंडाच्या घरी गेले असता तिथे काही तरुणांनी एकत्र येत त्यांना मारहाण करायला आणि शिविगाळ करायला सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. यावेळी काही वार वर्मी लागल्याने भरत साह बेशुद्ध पडले. त्यांना तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हे वाचा - धक्कादायक! पेट्रोलमध्ये थेट पाण्याचीच भेसळ, पेट्रोलपंपाचं गैरकृत्य अखेर उघड

पोलीस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी धीरज कुमारला अटक केली असून मारहाण करणाऱ्या इतर तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच इतरांना अटक करून कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

First published:

Tags: Bihar, Crime, Murder